धक्कादायक.. ३ वर्षाच्या चिमुकलीला बापानेच केला खून

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुणे : अनैतिक संबंधातून जन्म झाल्याचा संशयातून बापानेच तीन वर्षे चिमुकलीला हाल हाल करून मारलं.पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतून माणुसकीला काळिमा फासणारा आणि तितकाच धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

खाली डोकं आणि वर पाय धरून भिंतीवर तिचे डोके आपटून निर्घृण खून केला. हा सर्व प्रकार आंबेगाव बुद्रुक येथील श्रीकृष्ण अपार्टमेंट मध्ये घडला आहे.

जितेंद्र उत्तम पाटील (वय 33) असे अटक करण्यात आलेल्या वडिलांचे नाव आहे. तर मुस्कान (वय 3) असं खून झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. एका 24 वर्षीय महिलेने या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी जितेंद्र आणि फिर्यादी महिलेचा जानेवारी 2022 मध्ये विवाह झाला आहे. फिर्यादी महिलेने जितेंद्रला यापूर्वी आपला विवाह झाला असून तीन वर्षाची मुलगी असल्याचे सांगितले होते. तसेच पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला असल्याचेही तिने सांगितले होते. हे सर्व मान्य करूनच त्या दोघांनी लग्न केले होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी जितेंद्र याला आपल्या पत्नीचे पहिले लग्न झाले नसून झालेली मुलगी हि अनैतिक संबंधातून झाली असल्याची माहिती मिळाली होती. यातूनच गुरुवारी रात्री दोघांमध्ये वाद झाले झाले. या वादातूनच आरोपी जितेंद्र याने चिमुकल्या मुस्कान चे दोन्ही पाय वर करून तिचे डोके भिंतीवर आपटले.

या नंतर मुस्कान बेशुद्ध झाल्याने दोघांनी तिला तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. या दरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी जितेंद्र पाटील याला अटक केली आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.