Sunday, May 29, 2022

धक्कादायक.. पाचोऱ्यात दोघ मुलांच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

- Advertisement -

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील भास्करनगर भागात दोन मुलांच्या सहाय्याने पत्नीने पतीच्या पोटावर व छातीवर चाकूने वार करुन खून केल्याची घटना उघडकीस आली. पती हा माझ्या चारीत्र्यावर संशय घेत असून तो मला चाकूने वार करुन खून करण्याची धमकी देत असल्याने रक्ताच्या थारोळ्यात मरुन पडलेल्या पती विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी उलट तपासणी केल्याने वडीलांचा खून आम्हीच केल्याची कबुली दोघ मुलांनी व पत्नीने दिल्याने पोलीसांनी तीघ संशयीतांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा पर्यंत खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक भारत काकडे व पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी भेट दिली.

- Advertisement -

भास्कर नगर येथे राहत असलेला संजय बंकट खेडकर (वय ४६) हा राहत्या घरी कुलर बनविणे व दुरुस्ती करणे आणि विक्री करणे हा व्यवसाय करीत पत्नी दोन मुले असा संसाराचा गाडा ओढत होता. किरकोळ कारणावरून त्याचा पत्नीशी वाद होत असे संजय खेडकर हा निर्व्यसनी असल्याचे सांगण्यात आले. नेहमी प्रमाणे शनिवारी रात्रभर पती पत्नीमधे भांडण झाले होते. दरम्यान मुले मनोज संजय खेडकर, प्रतिक संजय खेडकर व पत्नी वंदना संजय खेडकर यांनी त्याच्या पोटावर व छातीवर धारधार चाकूने सपासप वार करुन त्याला ठार केलं व दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत कुणासही काही एक न कळू देता घरातच थांबून राहिले.

दरम्यान दिवसभर पोलीसांना काय सांगायचे याचा विचार करत दिवस घालवला व दुपारी दोन वाजता पत्नी वंदना, मुले मनोज व प्रतिक यांनी पोलीस स्टेशन गाढून माझा पती संजय हा माझ्या चारीत्र्यावर संशय घेत असून मला घरात येण्यासाठी मज्जाव करीत आहे व तू जर घरात आली तर मी तूला चाकू खूपसून मारुन टाकेल नाहीतर मी स्वतः हा चाकू खूपसून मारुन जाईल अशी धमकी देत असून त्यांचेपासून माझे जिवास धोका असल्याने त्यांचे विरोधात गुन्हा दाखल करा असे सांगितल्यानंतर पोलीसांनी तीघांना पोलीस ठाण्यात बसवून एका पोलीस कर्मचाऱ्यासह एक होमगार्ड घटनास्थळी पाठविले.

घटनास्थळी संजय खेडकर हा रक्ताच्या थारोळ्यात मरुन पडलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेबाबत पोलीसांचा संशय बळकावल्याने पोलीसांनी तिघांची चौकशी करताच माझे वडील हे माझ्या आईच्या चारीत्र्याधर संशय घेत असून ते सतत वाद घालता त्यामूळे आम्ही रविवारी सकाळी पाच वाजता त्यांचा चाकूने वार करुन खून केल्याची कबुली दिली. संशयित आरोपी पोलीसांच्या ताब्यात असून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या