धक्कादायक.. पत्नीने मद्यपान केल्याने डोक्यात कुऱ्हाड घालून पतीने केली हत्या

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आलीय. पत्नीने मद्यपान केल्याने पतीने डोक्यात कुऱ्हाड घालून पत्नीचा निघृण खून केलाय. याप्रकरणी मेहूणबारे पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

मार्च- २०२१ मध्ये कुवरसिंग चत्तरसिंग पावरा (रा. मोहरतमाळ, राज्य मध्यप्रदेश) हे दाम्पत्य सालाने काम करण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे शिवारात एकाच्या शेतात कामासाठी आले होते. ते याचठिकाणी एका शेडमध्ये राहत होते.

निनुबाई कुवरसिंग पावरा यांनी मद्यपान केले होते. दरम्यान कुवरसिंग चत्तरसिंग पावरा यांनी आपल्या पत्नीला तु मद्यपान का केले ? असा जाब विचारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा वाद विकोपाला गेल्यावर घरात पडलेली कुऱ्हाड डोक्यात घालून निनुबाईची निघृणपणे हत्या केली. सदर घटना १८ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच मेहूणबारे पोलिस सपोनि विष्णू आव्हाड, प्रकाश चव्हाण, धर्मराज पाटिल, सुभाष पाटिल, मोहन सोनावने, गोरख चकोर, हनुमंत वाघेरे, योगेश बोडके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी पती कुवरसिंग याने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केल्याची कबुली दिली.

याप्रकरणी पती कुवरसिंग याला मेहूणबारे पोलिसांनी अटक केले आहे. यासंदर्भात ज्ञानेश्वर माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहूणबारे परिसरात भादवी कलम- ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि विष्णू आव्हाड यांच्या निर्देशानुसार सुरू आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.