जळगाव शहरात तरुणाची निर्घृण हत्या

कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने वर्मी घाव

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क 

कौटुंबिक वादातून तरुणाचा निर्गुण खून झाल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे धारदार शस्त्राने भोसकून या तरुणाची हत्या करण्यात आली असून तरुणाच्या खुनाच्या घटनेने जळगाव शहर पुन्हा एकदा हादरून गेले आहे. आकाश पंडीत भावसार (वय ३०, रा. अयोध्या नगर) असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून ही घटना जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात ३ मे रोजी रात्री ११ वाजता घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

आकाश भावसार हा परिवारासह अयोध्यानगरात राहत होता. तो ट्रान्सपोर्ट नगरामध्ये वाहन भरण्याचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.दरम्यान अनेक महिन्यांपासून आकाशची पत्नी सातत्याने माहेरी जात होती. त्यामुळे त्यांच्या घरी कौटुंबिक वाद सुरू होता. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आकाशच्या सासरच्या मंडळींनी हॉटेल ए वन जवळ आकाश सोनार याला गाठले.

कौटुंबिक वादातून आकाशवर संशयित आरोपींनी धारदार शस्त्राने मांडीवर, छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर वार करून जखमी केले. आकाश यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय पथकाने तपासून त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ४ संशयीत तरुणांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.