शहरात पुन्हा खुन…! आरोपी अटकेत…!

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

शहरातील शाहू नगर परिसरात असलेल्या जळकी मील जवळील असलेल्या गटारीत एका तरुणाचा मृतदेह सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आढळून आला होता. हा तरुण गेंदालाल मिल मधील रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा (वय-२८) येथील असल्याचे समजते.

मिळालेली माहिती अशी की, गेंदालाल मिल परिसरात राहणारा रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा हा हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होता.  रेल्वे ट्रॅकला लागूनच असलेल्या गटारीत रमाचा मृतदेह उलटा पडलेला होता तर जवळच रक्त आणि दगड पडलेले होते.

शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच संशयितांची माहिती काढून खान्देश सेंट्रल परिसरातून तिघांना ताब्यात घेतले आहे. नेहमी शिवीगाळ करीत व आर्थिक देवाण घेवाणमुळे खून केल्याची माहिती तिघांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. विलास व पवन अशी संशयितांची नावे आहेत. शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तेजस मराठे व योगेश इंधाटे यांना संशयितांची गुप्त माहिती मिळाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here