सासरच्या अब्रूच्या भीतीने जावयाचा मृतदेह नदीत फेकला!

सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड

0

सासरच्या अब्रूच्या भीतीने जावयाचा मृतदेह नदीत फेकला!

सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड

रावेर लोकशाही न्यूज नेटवर्क

पाल येथे संशयास्पदरित्या आढळलेल्या तरुणाच्या मृत्यूचा रहस्यभेद पोलिसांनी केला असून, सासरच्या बदनामीच्या भीतीपोटी जावयाचा मृतदेह नदीपात्रात टाकल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याची पार्श्वभूमी: २६ मार्च रोजी रावेर तालुक्यातील पाल येथील वन प्रशिक्षण केंद्राजवळील सुकी नदीपात्रात सुरेश सुमऱ्या बारेला (२५) याचा मृतदेह आढळून आला. गळ्यावर व्रण असल्यामुळे हा घातपात आहे की आत्महत्या, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

सीसीटीव्ही तपासात उलगडले सत्य: उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत इंगळे व पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने पाल आणि पिपरूड येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. चौकशीत सुरेश बारेला याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

सासरच्या भीतीने मृतदेहाची विटंबना! गिरसिंग बारेला यांनी पोलिसांना सांगितले की, पिपरकुंडजवळील अंजनाच्या झाडावर हरलाल राजाराम बारेला यांचा जावई गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. मात्र, जावयाने सासरी आत्महत्या केल्याने समाजात बदनामी होईल या भीतीने त्याचे पार्थिव झाडावरून उतरवून नदीपात्रात फेकण्यात आले.

खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली पोलिसांनी गिरसिंग किर्ता बारेला, तेरसिंग कजम्या बारेला, सिताराम कजम्या बारेला, संजय रेजला बारेला, रेजला गोटा बारेला, धीचल सिताराम बारेला आणि बारसिंग नावडा बारेला (सर्व रा. नवाड भाग, पिंपरकुंड शेतशिवार, ता. रावेर) यांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांच्या खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.