पोटच्या मुली सह पत्नीवर केले कुऱ्हाडीने वार, गळफास घेऊन स्वतःच संपवल स्वतःच जीवन

0

लखनऊ, लोकशाही न्यूज नेटवर्क

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणानं पत्नी आणि आपल्या चार महिन्यांच्या मुलीची कुऱ्हाड टाकत जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी आणि मुलीचा जीव घेतल्यानंतर त्यानं स्वतः गळफास घेऊन स्वतःच जीवनं संपवलं आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील रुदीखेडा गावात हा प्रकार धक्कादायक घडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रुदीखेडाचे रहिवासी असलेले सेवानिवृत्त कानूनगो श्यामलाल यांचा मुलगा मोहन कुमार (वय ३५) त्याची पत्नी सीमा (वय ३०) आणि दोघांची चार महिन्यांच्या मुलीसह वेगळा राहत होता. रविवारी त्याचा पत्नीसोबत भांडण झाल. त्यानंतर त्यांनं एका बंद खोलीत पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घालत तिची हत्या केली. त्यानंतर त्याला आपल्या पोटच्या मुलीची सुद्धा दया आली नाही, तिलाही त्यानं ठार मारलं. हे कृत्य केल्यानंतर त्याच खोलीत साडीनं गळफास घेत आत्महत्या केली.

शेजारच्यांमुळे मिळाली घरच्यांना माहिती

मृत कुटुंबाच्या घराजवळच जगन्नाथेश्वर मंदिरात भागवत कथेचा सप्ताह सुरु होता. त्यामुळं सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमात होते. कथेनंतर शेजारचे लोक आपापल्या घरी परतले, त्यानंतर काही महिलांना मोहनच्या घरात आरडाओरडा करत असल्याचा आवाज ऐकला पण काही वेळातच त्याच्या घरात पूर्णपणे शांतता जाणवली.त्यानंतर शेजारीच राहणाऱ्या मोहनच्या छोट्या भावानं त्याच्या वडिलांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांचे कुटुंबिय घरी पोहोचल्यानंतर आतला दरवाजा बंद असल्यानं त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या मजल्यावरील खिडखी तोडून घरात प्रवेश केला. तर मोहनची पत्नी आणि बाळ रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि त्यानं गळफास घेतल्याचं पाहून सर्वांना धक्काच बसला.

Leave A Reply

Your email address will not be published.