Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले!
    गुन्हे वार्ता

    मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले!

    चालक फरार : चित्रा चौकात भीषण घटना
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 22, 2026No Comments334 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    शहरातील अत्यंत गजबजलेल्या चित्रा चौक परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या एका लाल रंगाच्या बुलेटने धडक दिल्याने महानगरपालिकेचे कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर बुलेट चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    राजू शंकर सोनवणे (वय 56, रा. इंजिनिअरिंग कॉलेजच्या मागे, बांभोरी, ता. जळगाव) हे जळगाव महानगरपालिकेत नोकरीला आहेत. दुपारी 12 वाजेच्या सुमारास सोनवणे हे आपल्या डिस्कव्हर मोटरसायकलने (क्रमांक एमएच-19 बीएच-6001) नवजीवन शॉपच्या गल्लीतून चित्रा चौकाकडे जात होते. त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून येणाऱ्या एका लाल रंगाच्या बुलेट (क्रमांक 2615, पूर्ण क्रमांक माहीत नाही) वरील अज्ञात चालकाने आपले वाहन अत्यंत भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून सोनवणे यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

    या भीषण धडकेत राजू सोनवणे यांच्या उजव्या पायाला जबर दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर संबंधित बुलेट चालक जखमीला कोणतीही मदत न करता आपल्या वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी जखमी सोनवणे यांनी 20 एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. सोनवणे यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिसांनी अज्ञात बुलेट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    पुढील तपास जळगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुधीर साळवे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संबंधित लाल रंगाच्या बुलेटचा आणि त्याच्या चालकाचा शोध घेत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026

    गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif