मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबईच्या दादरजवळच्या माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे अपघात झाला. एकाच रेल्वे ट्रॅकवर दोन एक्सप्रेस गाड्या समोर आल्याने अपघात झाला आहे. मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर हा सर्व प्रकार घडला आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर गदग एक्सप्रेस- पाँडेचरी एक्सप्रेस आमनेसामने आल्या आहेत. या अपघातात एक्सप्रेस गाडीचे 3 डब्बे घसरले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणत्याही घातपाताची माहिती अजूनही समोर आलेली नाही.
Trains Update – 6
Trains cancelled/short terminated/short originated/rescheduled pic.twitter.com/K06itMmJoR— Central Railway (@Central_Railway) April 16, 2022
या अपघातामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. धीम्या मार्गावरील वाहतूक शुक्रवारी रात्री उशिरा सुरू करण्यात आली असून जलद मार्ग मात्र बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, जनशताब्दी, इंद्रायणी आणि मांडवी यासह अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
नेमकं काय घडलं ?
दादरवरुन पाँडेचरीच्या दिशेने 11005 या क्रमांकाची एक्सप्रेस निघाली. या एक्सप्रेसच्या मागे सीएसएमटी-गडक ही एक्सप्रेस गाडी होती. या एक्सप्रेसच्या लोको पायलटने पाँडेचरी एक्सप्रेसच्या मागील डब्ब्यांना धडक दिली. या धडकेत 3 डब्बे घसरले”, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
या गाड्या रद्द
दादर-माटुंगा दरम्यान झालेल्या रेल्वे अपघातामुळे गाडी क्रमांक ११००५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गदग एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १११३९ दादर-पुद्दुचेरी चालुक्य एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. संबंधित प्रवाशांना त्यांचा परतावा थेट बँक खात्यात किंवा रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवर देण्यात येईल.
लोकल आज रविवार वेळापत्रकानुसार
दादर-माटुंगा रेल्वे अपघातामुळे आज, शनिवारी (१६ एप्रिल) मुंबई उपनगरीय रेल्वेवरील मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण / कर्जत/ कसारा) रविवार वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येणार आहेत.
या गाड्या रद्द
दादर-माटुंगा रेल्वे अपघातामुळे (२२१४७) दादर शिर्डी साईनगर, (१७६१८) मुंबई नांदेड तपोवन, (२२१०६) मुंबई-पुणे इंद्रायणी, ( १२८६०) हावडा मुंबई गीतांजली, (१०१०४) मडगाव-मुंबई मांडवी, (२२१२०) करमळी-मुंबई तेजस, (१२०५२) मडगाव-मुंबई जनशताब्दी, ( ११०५८) अमृतसर-मुंबई या एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.