Tuesday, November 29, 2022

आता मुंबई पोलीस तयार करणार ब्रँडची टोपी, टी शर्टसह अनेक वस्तू

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

मुंबई :आता मुंबई पोलीस तयार करणार ब्रँडची टोपी, टी शर्टसह अनेक वस्तू ..मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर संजय पांडे यांनी मुंबईकरांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आता  मुंबई पोलिसांकडून काही कपडे व वस्तू तयार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

मुंबई पोलीस ब्रँडने त्यांची विक्री करून मिळणारे पैसे मुंबई पोलीस कल्याण निधीसाठी वापरले जातील, अशी माहिती पांडे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे झालेल्या संवादावेळी दिली.

संजय पांडे यांनी रविवारी दुपारी साडेतीन वाजता मुंबईकरांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांकडून आता टी शर्ट, टोपी, स्वेटर, ट्रॅक सूट, कप, परफ्यूम, पाण्याच्या बाटल्या अशा वस्तू बनवण्यात येणार असल्याचे सांगितले.

या वस्तू विविध शोरूममध्ये विकल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली. या संवादाला नागरिकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या