Thursday, May 26, 2022

कृष्णगोपाल आणि मदनगोपाल या जुळ्या भावांची जन्मशताब्दी ; ३ दिव्यांगांना शिवणयंत्रांची भेट

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

मुंबई:  स्वर्गीय श्रीकृष्णगोपाल मोतीलाल लडिवाल व स्वर्गीय श्री मदनगोपाल मोतीलाल लडिवाल ह्या जुळ्या भावांच्या जन्मशताब्दीच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवारातर्फे स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान संस्थे (दहिसर)च्या प्रांगणात संस्थेच्या सहकार्याने  दिव्यांगांसाठी शिवणयंत्र भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

- Advertisement -

संस्थेतर्फे सचिव श्रीमती सुधा वाघ ह्यांनी संस्थेच्या कार्याची ओळख सांगून  सर्वांचे संस्थेतील दिव्यांग बंधूभगिनींच्या व कार्यकर्त्यांच्या हस्ते लडिवाल बंधूभगिनींना संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली पुष्पगुच्छ देऊन त्यंचे स्वागत  केले. लडिवाल बंधूभगिनींच्या तर्फे त्यांच्याच हस्ते  संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना,

श्री. मुकेश व सुनिता ह्या दांपत्यास आणि श्रीमती मीना राठोड यांना शिवणयंत्र तर  श्री धवल व श्रीमती  निकीता ह्या दांपत्यास बिडींग यंत्र भेट देण्यात आले. लडिवाल परिवाराचे सदस्य तसेच स्नेहज्योत दिव्यांगसेवा प्रतिष्ठान चे पदाधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित होते.

ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेतर्फे श्री. मकरंद  भोसले ह्यांनी प्रार्थना व दोन गाणी सादर करून कार्यक्रमात रंजकता आणली.संस्थेच्या  श्री. अनिल सुतार ह्यांनी पाहुण्याचे आभार मानले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या