लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई : आधी सुमारे 32 वर्षे अस्मिता आणि नंतर स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान या संस्थांच्या माध्यमातून दिव्यांगांची अहोरात्र सेवा बजावत असल्याबद्दल बोरीवली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुधा अनिलकुमार वाघ यांचा भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील राणे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या अथर्व फौंडेशन तर्फे ‘मोस्ट इन्स्पिरेशन वूमन अवॉर्ड’ प्रदान करण्यात येऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात झालेल्या शानदार सोहोळ्यात सौ. सुधा अनिलकुमार वाघ यांना ‘मोस्ट इन्स्पिरेशन अवॉर्ड’ ने गौरविण्यात आल्यामुळे अस्मिता आणि स्नेहज्योत बरोबरच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘स्नेहज्योत’च्या संस्थापक आणि सचिव सौ. सुधा अनिलकुमार वाघ यांना अथर्व फाउंडेशन तर्फे ‘मोस्ट इन्स्पिरेशनल फीमेल लीडर 2022’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
याबद्दल, “सामाजिक कार्य कधीच पुरस्काराच्या हेतूने होत नाही. पण कौतुकाने छान वाटतं, प्रेरणा मिळते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले काम पोहोचविण्याची आणि त्यांचे सुद्धा हात आपल्या कार्याला जोडण्याची एक संधी मिळते. मी आणि माझी टीम अत्यंत नम्रतेने या पुरस्काराचा स्वीकार करतो”, अशा शब्दांत सौ. सुधाताई वाघ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत