विल्सन परेरांना मिळाला आठ वर्षानंतर न्याय हक्काच्या घरासाठी दिला लढा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र सहकारी संस्थाअधिनियम १९६० चे कलम २३(२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानव्ये श्री प्रशांत सोनवणे, उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई शहर, पूर्व उपनगरे व कोंकण मंडळ कार्यक्षेत्र, कोंकण ग्रहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडा, मुंबई याद्वारे ओम् श्री शांती कुंज को-ऑप हौसिंग सोसायटी लि, इमारत क्र. १०७, टिळक नगर, चेंबुर, मुंबई – ४०००८९ या संस्थेतील सदनिका क्र. बी – ७०३ साठी सभासद होणेबाबत श्री. विल्सन विनोद परेरा यांनी केलेले अपील मंज़ूर केले आहे.

संस्थेने एक महिन्याच्या आत अपीलकर्ता यांचे नावे भागदाखला अदा करुन वैधानिक नोंदवही मध्ये आवश्यक त्या नोंदी घ्याव्यात असे सदरचा आदेश दिनांक ०४/०३/२०२२ रोजी शिक्क्यानिशी दिले आहे.

अर्जदार श्री. विल्सन विनोद परेरा यांनी संस्थेतील सदनिका क्र. बी – ७०३ विकासक मे. आदित्य एंटरप्राईजेस यांचेकड़ून दि. ०७/११/२०१३ रोजीच्या नोंदणीकृत करारनाम्याद्वारे खरेदी केली व संस्थेचे सभासद मिलणेसाठी संसथेस आवश्यक कागदपत्रे, भाग वर्गणी, प्रवेश फ़ी इत्यादी सह दि. ०३/१२/२०१६ रोजी अर्ज़ पाठविले.

संसथेन दि. १५/०७/२०१६ रोजीच्या पत्रान्वये विकासाचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करणेबाबत कळविले, त्यानुषंगाने अर्जदार यांनी दि. ०१/०८/२०१६ रोजी विकासक मे. आदित्य एंटरप्राईजेस यांचे अर्जदार यांच्याकडे कोणतेही देय रक्कम नसल्याचे प्रमाणपत्र संस्थेकडे सादर केले परंतु सदर अर्जावर संस्थेने कोणतीही कार्यवाही केली नाही. बिकासकाकड़ून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय सभासदत्व देता येणार नाही. भोगवटा प्रमाणपत्र व सभासदत्व या दोन वेगळ्या बाबी असुन संस्थेने घेतलेली भूमिका चुकिची आहे असे दिसून आले.

अर्जदार श्री. विल्सन परेरा यांना न्याय मिलण्यसाठी आठ वर्ष वाट बघावे लागले कारण संस्थेचे एक सभासद विकासकाचे कागदपत्रांवर सही करण्यासाठी विकासक मे. आदित्य एंटरप्राईजेस यांना धमकी देऊन त्यांच्याकडून वारंवार पैसे घ्यायचे ज्या मूळे विकसकाच्या कामाला बरीच वर्ष लागली. या सगल्याचे पुरावे अर्जदार श्री विल्सन परेरा यांच्याकडे असल्यामुळे आपले भांडे उघड़ पडेल या भीतीने श्री विल्सन परेरा यांना आठ वर्ष सभासदत्व पासून संस्थेने वंचित ठेवले.

श्री. विल्सन विनोद यांचे म्हणणे आहे की टिळक नगर, चेंबुर मधे ९०% संस्थेमधे असे सभासद आहेत जे आपल्या फायद्यासाठी नवीन व जूने सभासदांना एकत्र येऊ देत नाहीत आणि संस्थेच नुकसान करतात. ते पुढ़े म्हणतात की लोकांनी १३, रोहिणी टिळक नगर, चेंबुर या संस्थाचे उदाहरण घ्यायला हवे जीथे नवीन व जूने सभासद एकत्र होऊन विकासकाकड़ून सगळी कामे करून घेतात म्हणून आज ही संस्था सर्वात चांगली व श्रीमंत संस्था टिळक नगर मधे मानली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.