Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»मुंबई महापालिकेच्या ३६ कोटीच्या ठेवी मोडणार
    महाराष्ट्र

    मुंबई महापालिकेच्या ३६ कोटीच्या ठेवी मोडणार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 25, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज बुधवारी मांडला जात आहे. तब्बल ४ दशकानंतर भाजपच्या ताब्यात मुंबई महापालिका गेली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. पालिकेचा अर्थसंकल्प जनतेसमोर येण्याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या ३६ कोटींच्या ठेवी मोडण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. विकासकामांसाठी ठेवी मोडणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

    मुंबई महापालिकेकडे एकूण ८१ ४४९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवीपैकी ३६ हजार ६२३ कोटी रुपये विविध प्रकल्पासाठी वापरणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत सत्तापालट झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सर्वात मोठा निर्णय घेतल्याचे समोर आलं आहे. ठेवीतील ४४ हजार ८२६ कोटी २३ लाख रुपये बांधील दायित्वापोटी राखीव आहेत. त्यामुळे त्या ठेवी मोडता येणार नाहीत. मात्र, ३६ हजार ६२३ कोटी ०९ लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट झालं आहे.

    मुंबई महानगरपालिकेचं वर्ष २०२६-२७ या वर्षासाठी अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिकेत सादर केलं. पालिकेचा अर्थसंकल्प ८० हजार ९५२ कोटींवर गेलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईच्या अर्थसंकल्पात ८.७७ टक्क्यांनी वाढ झालीये. गेल्या वर्षीय मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा ७४ हजार ४२७ कोटी रुपये इतका होता.

    मागील आर्थिक वर्षात महसुली उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज ४३१५९.४० कोटी इतके प्रस्ताविण्यात आले होते. ते आता १४६७७८.१२ कोटी असे सुधारण्यात आले आहे. या अंदाजामध्ये ८.३८% म्हणजेच ₹३६१८.७२ कोटी इतकी वाढ झाली आहे. ३१.०१.२०२६ पर्यंत ३४०३३.५६ कोटी रुपये इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झालं आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता अंदाजित महसुली उत्पन्न ₹५१५१०.९४ कोटी इतके प्रस्ताविण्यात आले होते. ते सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत १९.३५% ने जास्त आहे.

    #bjp Budget Deposits Mumbai Mumbai Municipal Corporation Municipal Corporation
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.