चिंताजनक.. मुंबईत कोरोनाच्या दोन नव्या व्हेरीयंटचे रुग्ण आढळले

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने कोरोना निर्बंध उठवले आहेत. मात्र मुंबईतून चिंताजनक बातमी समोर आलीय. मुंबईत कोरोनाचे दोन नवीन व्हेरियंट आढळले आहेत.

मुंबईत `कापा´ आणि `एक्सई´ उपप्रकाराचे रुग्ण सापडले आहेत. कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण (जिनोम सिक्वेंसिंग) अंतर्गत अकराव्या चाचणीमध्ये दोन नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत 99 टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे.

मुंबईत एकूण 230 नमुन्यांमध्ये ‘ओमायक्रॉन’चे 228 रुग्ण आढळले आहेत. तर एक रुग्ण ‘कापा’ उपप्रकाराने तर अन्य एक जण ‘एक्सई’ उपप्रकाराने बाधित असल्याचे समोर आले आहे. रुग्णालयात दाखल २१ पैकी कोणालाही प्राणवायू पुरवठा किंवा अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही, अशीही माहिती समोर आलीय.

कोविड १९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणाऱ्या चाचण्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केल्या जात आहेत. या अंतर्गत अकराव्या तुकडीमध्ये मुंबईतील 230 रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये दोन नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.