“मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटण..”

मुंबईत मराठी - गुजराती वाद पेटला, मनसैनिकांची धडक

0

मुंबई,  लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात सध्या मराठी आणि अमराठी वाढ जास्त वाढला आहे. मराठी भाषेचा, मराठी माणसाला अपमानास्पद वागणूक देण्याच्या घटना मुंबई आणि परिसरात घडत आहे. त्यातच घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी-गुजराती असा वाद उफाळून आला आहे. मराठी कुटुंबीयांना त्यांनी मांसाहार खाण्यावरून इमारतीमधील गुजराती-जैन यांनी अपमानास्पद टिप्पणी केली आहे.

घाटकोपर येथील एका सोसायटीमध्ये बहुतांश कुटुंब ही जैन, मारवाडी आणि गुजराती आहेत. तर केवळ चार मराठी कुटुंब आहेत. या 4 मराठी कुटुंबांना इतर कुटुंबीयांकडून मांसाहारी जेवणावरून गुजराती, जैन सदस्यांकडून त्रास दिला जात असल्याचे समोर आले आहे. या सोसायटीमधील शाह नावाच्या व्यक्तीकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो’,असे वारंवार म्हटले.

दरम्यान या घटनेची माहिती समजताच मनसैनिकांनी या सोसायटीमध्ये धडक दिली. यावेळी त्यांनी सोसायटीतील सदस्यांना इशारा दिला. या सोसायटीमध्ये चार मराठी कुटुंब आहेत. पण, त्यांना यापुढे त्रास दिला तर त्यांच्यासाठी 4000 लोक धावून येतील असेही त्यांनी म्हटले. मनसैनिक सोसायटीमध्ये पोहचले तेव्हा मराठी कुटुंबांचा अपमान करणारे शाह आणि इतर जण समोर आले नाहीत. तर इतर रहिवाशांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

Leave A Reply

Your email address will not be published.