प्रजासत्ताक दिनानिमित्त रोटरीतर्फे, गरजूंना महा अन्नपूर्णा भोजन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाणे 

 

मुंबई – देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सच्या वतीने पवईच्या ५ झोपडपट्टी परिसरातील गरजूंना महाअन्नपूर्णा भोजनाचे आयोजन करून त्यांच्यामध्ये आनंद वाटून घेण्याचे अभिनव कार्य करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या निमंत्रक क्लबच्या अध्यक्षा निमिष अग्रवाल होत्या आणि सदरप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ चे गव्हर्नर डॉ. राजेंद्र अग्रवाल, रोटेरियन व अखिल भारतिय अग्रवाल संमेलनाच्या राष्ट्रीय सचिव सौ. सुमन आर अग्रवाल आणि सह-यजमान असलेल्या इतर क्लबांच्या अध्यक्षांचे हस्ते खाद्यान्नाचे वाटप करण्यात आले, ज्यामध्ये १५००  जेवणाची पाकिटे, १५०० लाडू व २५०० बिस्किट पाकिटांचा समावेश होता.

२६ जानेवारी रोजी रोटरीच्या ‘५ लाख पुण्य के कदम’ प्रकल्पाचा सांगता समारंभ म्हणून महा अन्नपूर्णा फीडिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्याची सुरुवात 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनाच्यानिमित्ताने त्यांच्या दांडी यात्रेच्या प्रतिकार्थी 5 लाख पावले टाकून झाली, अशी माहिती देत सुमन आर अग्रवाल यांनी सांगितले की, प्रकल्पाचा हा पहिला टप्पा होता, जो अतिशय यशस्वीपणे पूर्ण झाला आणि दुसरा टप्पा ‘ पुण्य के कदम ‘ लवकरच सुरू होणार आहे.

आपली विश्वासू,

सौ. सुमन आर अग्रवाल

Leave A Reply

Your email address will not be published.