Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अध्यात्म»वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    अध्यात्म

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    श्रावणातील पहिल्या सोमवारी मंदिरातून निघणार महादेवाचे मुकुट
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 11, 2026No Comments193 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भुसावळ तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक वास्तू म्हणून परिचित असलेल्या वेल्हाळे येथील प्राचीन हेमाडपंथी श्री कपिलेश्वर महादेव मंदिरात यंदाही भव्य मुकुट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी, सोमवार दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी मंदिरातून महादेवाचे मुकुट बाहेर काढण्यात येणार असून, या सोहळ्यामुळे वेल्हाळे गावात भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    वेल्हाळे येथील श्री कपिलेश्वर महादेव मंदिर हे पूर्णपणे दगडात बांधलेले असून, मंदिराच्या भिंतींवर विविध देवी-देवतांच्या आकर्षक व सुबक मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. मंदिराची स्थापत्यशैली आणि प्राचीन रचना भाविकांसह इतिहास व वास्तुकलेच्या अभ्यासकांचेही लक्ष वेधून घेते.

    या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथील भगवान शंकराची पिंडी श्रीयंत्रावर प्रस्थापित असल्याचे मानले जाते. अशा स्वरूपाची दुर्मिळ पिंडी देशातील मोजक्याच ठिकाणी आढळत असल्याने श्री कपिलेश्वर महादेव मंदिराला धार्मिक व आध्यात्मिकदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

    गतवर्षी मुकुट सोहळ्यानिमित्त वेल्हाळे येथे मोठ्या उत्साहात महासोहळा पार पडला होता. यंदाही सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र, यावर्षी महादेवाचे मुकुट केवळ एक दिवस मंदिरात राहणार आहेत. त्यामुळे भाविकांनी याची विशेष नोंद घेऊन सोहळ्याच्या दिवशी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात आवश्यक तयारी सुरू असून, परिसरातील भाविक, शिवप्रेमी आणि नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ऐतिहासिक परंपरा आणि धार्मिक श्रद्धेचा संगम असलेल्या या भव्य मुकुट सोहळ्यास परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री कपिलेश्वर महादेव मंदिर फाउंडेशन, वेल्हाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026

    आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif