Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबियांवर काळाचा घाला !
    गुन्हे वार्ता

    देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबियांवर काळाचा घाला !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 26, 2025Updated:September 26, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबियांवर काळाचा घाला !

    मद्यधुंद डंपरचालकाने दुचाकीला चिरडले ! ; पती पत्नीसह मुलगा ठार ,दुसरा गंभीर

    पुरनाड फाट्याजवळील घटना ; संतप्त जमावाने डंपर पेटवला

    मुक्ताईनगर I लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ दि. २६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक देत जवळपास ५० ते ६० फुटांपर्यंत फरफटत नेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.दरम्यान डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर पूर्णाड फाटा येथे सुरू असलेले इंदोर हैदराबाद महामार्गाचे काम हे बी एन अग्रवाल ही कंपनी करत आहे या कंपनीचे मुरूम भरलेले डंपर एम एच 19 सी एक्स 2038 रस्त्याने जात असताना या डंपर ने दुचाकी वर असलेले पती-पत्नी नितेश जगतसिंग चव्हाण वय 32, सुनिता नितेश चव्हाण वय 25, शिव नितेश चव्हाण वय 7 वर्ष सर्व राहणार मातापुर तालुका डोईफोडा जिल्हा बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) या तिघांचा डंपरच्या टायराखाली आल्याने जागीच मृत्यू झाला तर नेहाल सिंग नितेश सिंग चव्हाण वय 11 वर्ष हा जखमी सून याला पुढील उपचारासाठी जळगाव पाठविण्यात आले आहे. हे कुटुंबीय दुचाकीने दोघे मुल आणि पती-पत्नी इच्छापुर येथे देवीच्या दर्शनासाठी जात होते ते कामानिमित्त जळगाव येथे वास्तव्यास आहे. परंतु इच्छापुर येथे जाण्याआधी पूर्णाड फाट्यावर अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. यावेळी घटनास्थळी संतप्त जमावाने बी एन अग्रवाल कंपनीचे चालक हे मद्यपान करून नेहमी वाहने चालवत असतात असा आरोप करीत वाहनाची तोडफोड करत जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. उशिरापर्यंत तिघेही मृतदेह मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय शवविच्छेदनासाठी होते. पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

     

    #crime acident muktainagat
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif