असंख्य मुस्लिम बांधवांसह शेकडो नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश !

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यशैलीने व नागरिकांच्या तळागाळातील पायाभूत व मूलभूत सोयी सुविधांची विविध विकास कामांपासून प्रभावित होऊन आज कुऱ्हा वढोदा परिसरातील असंख्य मुस्लिम बांधवासह शेकडो नागरिकांनी दि. 27 फेब्रुवारी रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू झालेले असून नुकतेच गेल्या आठवडयात भोटा येथील शेकडो कार्यकर्ते व आज झालेल्या शेकडोंच्या संख्येतील प्रवेशाने कुऱ्हा व वढोदा परिसरात शिवसेनेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

यावेळी शिवसेना अल्पसंख्याक आघाडी संघटक अफसर खान, उपतालुका प्रमुख नवनीत पाटील, कुऱ्हा शहर प्रमुख पंकज पांडव, सतीश नागरे, प्रमोद वाघमारे, जावेद खान, अकबर ठेकेदार, शे फारुख, कुर्बान तडवी सरपंच, रमेश ताडे, पंकज धाबे, अविनाश वाढे, राहुल चिखलकर, विनोद पाटील काकोडा, दीपक वाघ, नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती मुकेश वानखेडे, वसंत भलभले, आरिफ आझाद, युनूस खान, नूरमोहम्मद खान, महेंद्र मोंढाळे, नगरसेवक संतोष मराठे तसेच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

यांनी घेतला प्रवेश
अन्ना पवार, रमेश तायडे, नारायण खिरळकर, अनंत साठे, अमोल गाडगे, उद्धव कोथळकर, इम्रान खान (हाजी), फारुख खान, समीर खान, शेख हुसेन, मुस्तकीन शाह, शाहरुख शहा, शेख अलीम, शेख हुसेन, इब्राहिम खान, मोहम्मद नुरा, हसन खान, इरफान जमदार, समीर काजी, फारुख जमदार, अरबाज खान, शेख रईस, हसन खान आदींनी शिवसेनेत प्रवेश घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here