शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुक्ताईनगरात राष्ट्रवादीचा जन आक्रोश मोर्चा

0

मुक्ताईनगर , लोकशाही नेटवर्क

कापसाला १५ हजार प्रती क्विंटल भाव मिळावा, केळी पिक विम्यातील जटिल अटी रद्द कराव्या, केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे , अशा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताई नगर विधानसभा क्षेत्राच्यावतीने जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगर येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गोदावरी मंगल कार्यालय येथुन मोर्चाची सुरुवात करण्यात येऊन तहसील कार्यालय येथे मोर्चाची सांगता करण्यात आली. मोर्चात केळीचे खोड, कांद्याच्या माळा, कापूस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे लावून बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. त्या लक्ष वेधून घेत होत्या . अजय तळेले यांनी सादर केलेला कुंभाकर्णाचा सजीव देखावा लक्ष वेधून घेत होतायावेळी हजारो कार्यकर्ते व शेतकरी बांधव सरकार विरोधी घोषणा देत मोर्चात सहभागीझाले होते यातून शेतकऱ्यांचा शासनाप्रती असलेला आक्रोश दिसुन येत होता.

गोदावरी मंगल कार्यालय येथून मोर्चाला सुरुवात होऊन प्रवर्तन चौक, बस स्थानक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर आला तेथे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना शेतकरी बांधवांच्या प्रश्नाचे निवेदन दिले त्यानंतर तहसील कार्यालयाजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले.


यावेळी उपस्थितांना संबोधित करताना रोहिणी खडसे म्हणाल्या भाजपाचे केंद्र सरकार व राज्यातील शिवसेना शिंदे गट व भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केलेले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकारकुंभाकर्णी झोपेचे सोंग घेत आहे.शेतकरी बांधवानी मोठ्या कष्टाने पिकवलेले पांढरे सोने कापूस योग्य भाव मी मिळत नसल्याने घरात पडून मातीमोल होण्याची परिस्थिती उद्भवली आहे तरी सुद्धा केंद्र सरकार मात्र कापसाच्या गाठी आयात करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. जळगाव जिल्हयात केळीचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते .

मागील वर्षी केळी वर सि एम व्ही रोगाचे संक्रमण आल्यामुळे केळी उपटून टाकावी लागली केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यावर केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुक्ताईनगर येथील सभेत केली होती. परंतु ती हवेत विरली असुन एकनाथराव खडसे यांना तारांकित प्रश्नांला उत्तर देताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानभरपाई न देता नवीन केळी लागवडी साठी केळी रोपांवर अनुदान देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे सांगितले केळी रोपांवर 2014 पर्यंत शासन अनुदान देत होते परंतु भाजप सरकार आल्या नंतरहे अनुदान बंद झाले म्हणजे आता सरकार बाशा कढिला उत आणत आहे.

या आहेत मागण्या
कापसाला प्रती क्विंटल रु.१५०००/- (पंधरा हजार ) भाव देण्यात यावा वा किमान रु. ७५००/- प्रती क्विंटल अनुदान देण्यात यावे. सीएमव्ही रोगामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी.पिक विमा कंपन्याकडून केळी बागांची वारंवार होणारी जिओ टॅगिंग पळताळणी बंद करण्यात यावी. वन्य प्राण्यामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी. पिक विम्याची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी. यासह विविध मागण्यांचा यात समावेश आहे.

गहू,तूर व हरभरा खरेदी केंद्र ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीद्वारे त्वरित सुरु करावी अशा विविध मागण्या करताना रोहिणी खडसे यांनी केंद्र व राज्य शासनावर सडकून टिका केली . भाषणादरम्यान रोहिणी खडसे यांनी व्यंगात्मक कविता म्हणून दाखवली त्याला उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोर्चाला संबोधित करताना म्हणाले शेतकऱ्यांच्या समोर विविध प्रश्न आ वासून उभे असून केंद्र व राज्य शासन त्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे सरकारने हे प्रश्न सोडविले नाही तर आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी माजी आमदार अरुण पाटील,यु डी पाटील, आबा पाटील,प्रमोद धामोळे यांनी मोर्चाला संबोधित केले.दरम्यान रोहिणी खडसे यांचे भाषण सुरू असताना अंतुर्ली येथील शिरतुरे नामक शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल शिडकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.  परंतु उपस्थितांच्या सतर्कतेने अनर्थ टळला.

यावेळी मोर्चात माजी आमदार अरुण पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,क्षेत्र प्रमुख विजय सोनार,किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष यु डी पाटील, प्रशांतआबा पाटील ,पवनराजे पाटील, विशाल खोले महाराज,माजी सभापती विलास धायडे, किशोर चौधरी,राजेंद्र माळी, दशरथ कांडेलकर, विकास पाटील, प्रदिप साळुंखे, निलेश पाटील,रामदास पाटील, दिपक पाटील, अमोल महाजन, किशोर पाटील,हेमराज पाटील, रविंद्र पाटील,सुधीर तराळ,रामभाऊ पाटील, माणिक पाटील, अनिल पाटील, अनिल वराडे, डॉ बी सी महाजन, सोपान दुट्टे,रवींद्र दांडगे, सुनिल काटे, वामन ताठे, सतिष पाटील,विजय चौधरी, प्रदिप बडगुजर,रणजित गोयनका,प्रवीण पाटील, मस्तान कुरेशी, रउफ खान,लता ताई सावकारे, रंजना कांडेलकर, वंदना पाटील, कविता गायकवाड व इतर पदाधिकारी सहभागी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्या मुळे सर्व मुक्ताईनगर शहर राष्ट्रवादीमय झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.