Wednesday, February 1, 2023

बसने विद्यार्थिनीला उडवले; सायकलचा चक्काचूर

- Advertisement -

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरात स्टेट बँकेजवळ बसने विद्यार्थिनीला उडवल्याने ती जखमी झाल्याची घटना घडली आहे.

आज सकाळी शहरात स्टेट बँक जवळ बारा वर्षाच्या मुलीस बसने धडक दिली, यात त्या मुलीची सायकल चक्काचूर झाली असून विद्यार्थिनीही जखमी झाली आहे.  एम एच 14 बीटी ४१० या क्रमांकाची शेगाव ते नवापूर बस ही वेगाने जात असताना ऋतुजा राजेंद्र कोल्हे या विद्यार्थिनीला बसने धडक दिली.  यात सदर विद्यार्थिनीची सायकल पूर्णपणे चक्काचूर झाले असून ऋतुजा ही जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ऋतुजाला तात्काळ रुग्णालयात नेले. शहरात नगरपंचायतीने कुठेही गतिरोधक उभारलेले नसल्याने अनेकदा लहान मोठे अपघात होत असतात.  यातच आज विद्यार्थिनीचा अपघात झाल्याने संतापाची लाट उसळत आहे.  नगरपंचायत व पोलीस प्रशासन मिळून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली असती तर असे अपघात होणार नाही.  तसेच हेडगेवार कॉम्प्लेक्स जवळ नेहमीच बेशिस्त वाहने लावलेले असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे