दर्शन करून परतणाऱ्या दुचाकीला अपघात ; बऱ्हाणपूरचा तरुण गंभीर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
शिरसाळा येथून दर्शन करून परत येत असताना कारने मारलेल्या कटमुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील बऱ्हाणपूरचा युवकाचा पाय तुटल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना आज सारोळा माळेगाव वळण रस्त्यावर घडली असून दुसरा युवक किरकोळ जखमी झाला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि ,बऱ्हाणपूर येथील रहिवाशी असलेले मनोज पर्वत ठाकूर वय २० आणि मोहित गणेश महाजन वय १९ दोन्ही रा. रात्रिपुरा बऱ्हाणपूर हे आज दुचाकीने शनी अमावस्यानिमित्त पहाटे चार वाजता मारुतीचे दर्शन घेऊन बऱ्हाणपूरकडे जात असतांना सारोळा माळेगाव वळण रस्त्यात एका अज्ञात बोलेरो चार चाकी वाहनाने कट मारल्याने झालेल्या अपघातात मनोज पर्वत ठाकूर याचा पाय गुडघ्यापासून तुटल्याने तो गंभीर जखमी झाला. तर त्याच्यासोबत असणाऱ्या मोहित महाजन याला किरकोळ जखम झाली.

घटनेची माहिती कळताच घटनास्थळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन पोलीस कॉन्स्टेबल गणेश मनोरे ,पोलीस कॉन्स्टेबल धर्मेंद्र ठाकूर यांनी तसेच मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका घेऊन आरोग्य सेवक प्रदीप काळे चालक रवी जंगले यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली . जखमींना उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले. तर मनोज ठाकूर याचा तुटलेला पाय पिशवी टाकून आणावा लागला अशी माहिती प्रदीप काळे यांनी दिली.

जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. शोएब खान डॉ. प्रशांत रावणचे आरोग्य सेवक प्रदीप काळे, परिसेविका कल्पना नगरे, सुनिता कसबे आदींनी उपचार केले . तसेच जखमींना पुढील उपचारार्थ जखमींच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी बऱ्हाणपूर येथे नेण्यात आले आहे. याबाबत पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Leave A Reply

Your email address will not be published.