Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»तापी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन
    गुन्हे वार्ता

    तापी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 20, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तापी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन

    मुक्ताईनगर तहसीलदारांची कारवाई
    मुक्ताईनगर प्रतिनिधी : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात तापी नदी पात्रालगत सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीचा मोठा प्रकार तहसीलदार गिरीश रामेश्वर वखारे यांच्या नेतृत्वाखालील महसूल पथकाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी ट्रॅक्टरचा अज्ञात चालक, मुकेश धनगर व संजय धनगर यांच्याविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.तहसीलदार गिरीश वखारे यांनी दिलेल्या सरकारी फिर्यादीनुसार, दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते १०.०० वाजेच्या सुमारास महसूल पथक अंतुर्ली परिसरात गस्त घालत असताना तापी नदीकडे जाणाऱ्या कच्च्या व अरुंद रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर आढळून आला. सदर ट्रॅक्टर क्रमांक MH-19 AN 0535 (स्वराज कंपनी, लाल रंग) व निळ्या रंगाची ट्रॉली असून त्यावर “हरी ओम ट्रेलर्स, ता. मलकापूर, जि. बुलढाणा” असे लिहिलेले होते.

    ट्रॅक्टर चालकाकडे चौकशी केली असता त्याने ट्रॉलीमधील रेती नदी पात्रालगत खाली केल्याची कबुली दिली. महसूल पथकाने तात्काळ ट्रॅक्टरची चावी काढून वाहन जागीच थांबवण्याच्या सूचना दिल्या. नदी पात्रालगत पाहणी केली असता तेथे एक ब्रास (सुमारे ५,८०० रुपये किंमतीची) वाळू प्रत्यक्षात आढळून आली.
    यावेळी मोटारसायकलवर असलेला मुकेश धनगर (हिरो सुपर स्प्लेंडर क्रमांक MH-19 DD 0779) याने ही रेती त्याच ट्रॅक्टरमधून खाली केल्याचे सांगितले. मुकेश धनगर हा महसूल पथकाचा पाठलाग करत असल्याचे दिसून आले असून, त्याने ट्रॅक्टर चालकाला फोनद्वारे महसूल पथक आल्याची खबर देऊन रेती उतार करण्यास सांगितल्याची खात्री पथकाला झाली.

    दरम्यान, इतर वाहनांची तपासणी करण्यासाठी महसूल पथक नदी पात्राकडे पायी गेले असता, मागील बाजूस ट्रॅक्टरचा आवाज येताच परत येऊन पाहणी केली असता ट्रॅक्टर तसेच मुकेश धनगर हे दोघेही घटनास्थळावरून पळून गेल्याचे आढळले. कच्च्या रस्त्यामुळे शासकीय वाहन नदीकडे नेता न आल्याने पथकाला पायी तपासणी करावी लागली.

    यानंतर अंतुर्ली दूरक्षेत्र येथे लेखी तक्रार देत असताना संजय तुकाराम धनगर हा व्यक्ती तेथे आला. त्याने स्वतःला कथित “तालुका अँटी करप्शन (ANTI CORRUPTION) संघटनेचा अध्यक्ष” असल्याचे सांगून कारवाईबाबत चौकशी केली. मात्र, संघटनेबाबत अधिकृत नोंदणी अथवा ठोस पुरावा सादर न करता केवळ मोबाईलमध्ये कार्डचा फोटो दाखवण्यात आला. पुढील चौकशीत संजय धनगर हा मुकेश धनगरचा काका असून, नरवेल येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पाटील नरवेल यांच्या माहितीनुसार, मुकेश व संजय धनगर हे दोघेही अवैध रेती व्यवसायात सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, ट्रॅक्टर क्रमांक MH-19 AN 0535 हा संजय धनगरच्या नावे नोंदणीकृत असल्याचे आरटीओकडून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कथित अँटी करप्शन संघटनेची भीती दाखवून शासकीय कारवाई रोखण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

    या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र महसूल संहिता कलम 48(7), 48(8) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 303(2) व 62 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस विभागाकडून सुरू आहे. अवैध रेती उत्खननावर महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कडक कारवाईचा इशारा दिला असून, अशा बेकायदेशीर व्यवसायाला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif