मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर बऱ्हाणपूर रस्त्यावरील पुर्णाड फाट्याजवळ मुक्ताईनगर पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव यांच्या संयुक्त कारवाईत दोन कोटी आठ लाख 82 हजार 580 रुपयांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना 1 डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
मुक्ताईनगर पोलिसात फिर्यादी रवींद्र अभिमान पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल यांनी दिलेल्या तक्रारीवरून साकारउल्ला अब्दुल अजीज (वय 35, रा. इमाम नगर तहसील जेरका फिरोजपुर हरियाणा), कैफ फारुख खान (वय 19,रा. ढळायत तहसील पहाडी जिल्हा भरतपुर राजस्थान) , तारीफ लूकमान खान (वय 23, रा. इमाम नगर तहसील जेरका फिरोजपुर जिल्हा नुहू मेवात राज्य हरियाणा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला. आरोपी हे बऱ्हाणपूरकडून मुक्ताईनगरकडे माल ट्रक क्रमांक एन एल 01 एजे 1725 यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला 5 एच के व रॉयल 1000 सुगंधित तंबाखू गुटखा वाहतूक करत असताना पोलीस पथकाने कारवाई केली.
या कारवाईत एक कोटी 34 लाख 88 हजार 480 रुपये किमतीचा एकूण 102 पिवळ्या रंगाच्या गोण्यांमध्ये 5 एचके असे इंग्रजी मध्ये लिहिलेले पाऊच मध्ये 76 नग छोटी गुटक्याची पोळी प्रत्येकी 5 रुपये किमतीची आढळून आली. तसेच 43 लक्ष 77 हजार 600 रुपये किमतीचे एकूण 32 पांढऱ्या रंगाच्या मोठ्या गोण्यांमध्ये 60 प्लास्टिक पन्नीचे पाऊच त्यावर रॉयल 1000 असे इंग्रजी मध्ये लिहिलेले सदर पाऊच मध्ये 76 नक छोटी गुटख्याची पुढील प्रत्येकी पाच रुपये तसेच 30 लक्ष रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक,10 हजार रुपये किमतीचा विवो मॉडेल चा मोबाईल फोन, तसेच 5 हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व 1500रुपये रोख अशा एकूण दोन कोटी आठ लाख 82 हजार 580 रुपयांचा सुगंधित गुटक्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी तपास करत आहेत. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये भाग पाच गुरु 419, 224, भारतीय न्याय संहिता 223 चे कलम 123, 274, 275 3( 5 ),223 सह अन्नसुरक्षा मानके अधिनियम सन 2023 चे कलम 26(2 ) प्रमाणे मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.