रावेर ;- लोकसभा क्षेत्रात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची दि.०९ एप्रिल २०२३ रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा, भोटा, रिगाव, सुळे व वडोदा ई. ठिकाणी खासदार रक्षाताई खडसे यांनी भाजपा पदाधिकारी, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच तत्काळ पंचनामे करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या.
अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील उभ्या पिकांचे खूप मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले असून, त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरुपूर प्रयत्न करणार असल्याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी यांना आश्वासन देऊन धिर दिला.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह .अशोक कांडेलकर,विनोद पाटील,चंद्रकांत भोलाने, राजु सवळे, प्रविण शिंपी, सोपान झाल्टे, रवि राजपूत, विशाल झाल्टे, विकास कांडेलकर, गोपाल कांडेलकर, नितीन सोंडे, निखिल भोलाणकर, ज्ञानेश्वर ढोले, काकोडा उपसरपंच भरत मदने, विठ्ठल कांडेलकर, .विनोद चौधरी, प्रवीण खिरळकर, दिगंबर विटे, अशपाक ठेकेदार, अजगर खान, शुभम काळे ई. सोबत उपस्थित होते.