ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचा निषेध

ग्रा.पं सदस्याचे जि.प समोर आमरण उपोषण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर तालुक्यातील कोऱ्हाळा ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराला सतत पाठीशी घालणाऱ्या जिल्हा प्रसाशनाच्या निषेधार्थ तसेच झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कार्यवाही करावी, या मागणीसाठी जळगाव जिल्हा परिषद कार्यालय समोर २३ मे पासून ग्रामपंचायत सदस्य संतोष कोळी यांनी आमरण उपोषण पत्करले आहे.

कोऱ्हाळा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भष्ट्राचाराच्या चौकशी संदर्भात वारंवार शासनाच्या व प्रशासकिय अधिकारी व कार्यालय पत्रव्यवहार मार्फत निदर्शनास आणून देखिल संबंधित विभाग अर्जाची दखल घेत नसल्यामुळे तसेच मुक्ताईनगर येथील गटविकास अधिकारी दुर्लक्षित करून ग्रामसेवक व सरपंच यांना पाठीशी घालीत असल्याचा आरोप केला आहे. तसेच माहीती अधिकारा मार्फत अर्ज मार्फत परिपूर्ण माहीती देत नसल्यामुळे जिल्हा परिषद कार्यालय समोर आमरण उपोषण पत्करले आहे.

सदरील प्रकरणाची चौकशी पडताळणी करत नाही. व संबंधितांवर कठोर कार्यवाही करत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहणार असणार असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here