Wednesday, September 28, 2022

किरीट सोमय्यांच्या विरोधात शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

- Advertisement -

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्यांने घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे. त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरीत तुरुंगात टाका अशा प्रमूख मागणीसाठी मुक्ताईनगर शिवसेनेतर्फे आज येथील प्रवर्तन चौकात प्रचंड निदर्शने करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

- Advertisement -

शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०१३ मध्ये आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्याने मोहीम सुरू केली. केंद्र आणि राज्य सरकारांनी असमर्थता दर्शवल्यानं किरीट सोमय्या पुढे आले आणि प्रचंड निधी गोळा केला. त्यासाठी रेल्वे स्थानकांवर विमानतळावर डबे घेऊन उभा राहिले. आयएनएस विक्रांत हा देशाच्या दृष्टीनं अभिमानाचा विषय असल्यानं लोकांनी सढळ हस्ते दान केलं.

नेव्हीनगरमध्ये राहणाऱ्या नौदलाच्या अनेक अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये दिले. या रकमेचं किरीट सोमय्याने काय केलं ते देशाला समजायला हवं, ही रक्कम तो भंगारात जाऊ पाहणाऱ्या विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनविण्याकरिता राजभवन येथे जमा करणार होता, मात्र सोमय्याने गोळा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याचं आरटीआयमधून समोर आलं आहे. लोकांच्या देशप्रेमाशी खेळून किरीट सोमय्याने गद्दारी केलं आहे. त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा.

किरीट सोमय्याने आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या निधीचं काय झालं ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण तो देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. लोकांनी मोठ्या विश्वासानं विक्रांत वाचवण्यासाठी देणगी दिली. राजभवनानं आपल्याला किरीट सोमय्याकडून कोणताच निधी किंवा चेक मिळाला नसल्याचं माहिती अधिकाराखाली मागविलेल्या उत्तरावर स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे.

किरीट सोमय्याने गोळा केलेला पैसा राजभवनात जमा झाला नाही, मग तो कोणाच्या खिशात गेला ? हा पैसा कोणी खाल्ला ? ह्याची उत्तरे राज्यातील जनतेला मिळायलाच हवीत. या घोटाळ्यात किरीट सोमय्यांने अंदाजे १०० कोटींचा घोटाळा करून हे पैसे त्याच्या बांधकाम व्यवसायाकरिता तसेच निवडणूक खर्चाकरिता वापरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा देशद्रोही कृतीमुळे किरीट सोमैय्याला राज्यात काय देशातही राहण्याचा खरेतर अधिकार नाही. या देशद्रोह्याची जागा तुरुंगातच असायला हवी.

महाराष्ट्रातील तसेच देशातील जनता या प्रश्नाचे उत्तर किरीट सोमय्या तसेच भाजपकडून मागत आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांचेवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी आंदोलक शिवसेनेतर्फे दिलेल्या पत्रात करण्यात आलेली आहे.

प्रसंगी शिवसेना तालुका प्रमूख छोटू भोई, जिल्हा अल्पसंख्याक प्रमूख अफसर खान, उप तालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शिवाजी पाटील (कोळी), जीवराम कोळी, नवनीत पाटील, शहर प्रमुख राजेंद्र हिवराळे, गणेश टाँगे, शहर संघटक वसंत भलभले, नगरसेवक तथा बांधकाम सभापती संतोष मराठे, नगरसेवक पियूष मोरे, माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, युनूस खान, संतोष माळी, किरण कोळी, अशोक कुंभार, देवानंद वंजारी, भास्कर पाटील, पिप्री पंचम सरपंच योगेश चौधरी, चारठाणा सरपंच सुर्यकांत पाटील, इच्छापुर सरपंच गणेश पाटील, राजू कापसे, सचिन (पिंटू) पाटील, दीपक पवार, दीपक खुळे, आकाश सापधरे, पवन सोनवणे, शिवाजी पवार, राजू बंगाळे, बबलू वंजारी, मनोज भोई, युवराज कोळी, मोहन बेलदार, राजू तराळ, सुधीर कुलकर्णी, संचालाल वाघ, स्वप्नील श्रीखंडे, गणेश घाईट, गोलू मुऱ्हे, शकुर जमदार, सलीम खान, जाफर अली, भागवत कोळी, महिला आघाडी शहर संघटक सरिता कोळी, उषा पाटील, अलका कांडेलकर, संगीता कासार, विजय सावळे, तानाजी पाटील, निलेश घुले, प्रमोद सोनार, अमोल कांडेलकर , निलेश घटे, साबीर पटेल, निलेश घुले, हरी माळी, पप्पू मराठे, विशाल नारखेडे, रोशन पाटील, विशाल पाटील आदींसह असंख्य शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या