मुक्ताईनगर तालुक्यात आ. चंद्रकांत पाटील यांनी नुकसानीची केली पाहणी

0

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क

शनिवारी रात्री अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व वादळाने मुक्ताईनगर मतदार संघातील अनेक भागात  गहू  व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून ऐन हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी राजा वर अस्मानी संकट उद्भवले आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी सकाळीच मतदार संघातील कुऱ्हा परिसरातील सुळे, चिचखेडा खू व इतर असंख्य गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली. येथून जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून नुकसानीची माहिती दिली तसेच शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिवळून देण्याचे आश्वासन देत झालेल्या परिस्थितीतून सावरण्यासाठी त्यांना धीर दिला.
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा भागातील सुळे, चिचखेडा खू व इतर असंख्य गावातील नुकसान भागात शेतकरी बांधवांच्या बांधावर जावून प्रचंड नुकसान झालेल्या गहू व इतर पिकांची पाहणी केली. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून मुक्ताईनगर तालुक्यातील सुळे , चिचखेडा खू , अंतूर्ली परिसर व इतर असंख्य गावे तसेच रावेर तालुक्यातील खिर्डी, थोरगव्हान परिसर तसेच इतर अनेक गावात गहू व इतर पिकांची नुकसानीची माहिती दिली. आणि नुकनीचे तात्काळ पंचनामे करणे कामी पथके तयार करून पंचनामे करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संवाद साधत नुकसानीची माहिती देत नुकसान ग्रस्त शेतकरयांना तात्काळ भरपाई दिलासा देण्याची विनंती केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील हे शेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना तात्काळ मदत देण्याचे आश्वासन दिले तसेच आमदार पाटील यांनी बांधावर पाहणी करतांना सर्व शेतकरी बांधवांना झालेल्या परिस्थितीतून सावरण्यासाठी धीर दिला व नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी नवनीत पाटील, विनोद पाटील, अमोल पाटील , दीपक वाघ, संदीप घाईट, विनोद ढोले, यांचेसह शेतकरी बांधव रविंद्र पाटील , संदीप घाईट, डॉ बाके, डॉ घाईट आदींसह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here