नोकरीची संधी..! महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 122 जागांची भरती

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध प्रकारच्या 122 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जाणून घेऊया अधिक माहिती..

पदाचे नाव आणि पद संख्या 

▪️ कक्ष अधिकारी/कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक – 08

शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी, (ii) 03/06 वर्षे अनुभव

▪️ उच्चश्रेणी लघुलेखक – 02

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण. (ii) इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 120/50 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव.

▪️ सहायक लेखापाल – 03

शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव.

▪️ निम्नश्रेणी लघुलेखक – 02

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण. (ii) इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/30 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव

▪️ सांख्यिकी सहायक – 02

शैक्षणिक पात्रता : 45% गुणांसह सांख्यिकी /बायोमेट्रिक्स /अर्थशास्त्र/गणिती अर्थशास्त्र/गणित पदव्युत्तर पदवी किंवा MCA

▪️ वरिष्ठ सहायक – 11

शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव.

▪️ विद्युत पर्यवेक्षक – 01

शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा किंवा ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन) (ii) 03 वर्षे अनुभव.

▪️ छायाचित्रकार – 01

शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण. (ii) फोटोग्राफी/कमर्शियल आर्ट्स/ फाइन आर्ट्स डिप्लोमा किंवा फोटोग्राफी सिनेमेटोग्राफी कोर्स. (iii) 03 वर्षे अनुभव.

▪️ वरिष्ठ लिपिक/DEO – 08

शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण. (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.

▪️ लघुटंकलेखक – 14

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण. (ii) लघुलिपी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.

▪️ आर्टिस्ट कम ऑडिओ व्हिडिओ एक्सपर्ट – 01

शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) अप्लाइड आर्ट्स किंवा फाइन आर्ट्स सह फोटोग्राफी डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

▪️ लिपिक कम टंकलेखक/DEO/रोखपाल/भांडारपाल – 55

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.

▪️ वीजतंत्री – 02

शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन) (iii) 05 वर्षे अनुभव.

▪️ वाहनचालक – 03

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहनचालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.

▪️ शिपाई – 09

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

वयाची अट : 18 ते 38 वर्षे. (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट)

फी : खुला प्रवर्ग : 1 हजार रुपये (मागासवर्गीय : 700 रुपये)

नोकरी ठिकाण : नाशिक

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 07 सप्टेंबर 2022 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट पाहाhttps://muhs.ac.in

 

Leave A Reply

Your email address will not be published.