बहुप्रतीक्षित शिवाजी नगर उड्डाणपूल सुरु…

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

शहरातील बहुप्रतीक्षित असलेला शिवाजी नगर उड्डाणपूल माहिती अधिकार कार्यकर्ते (RTI) दीपककुमार गुप्ता यांच्या पुढाकारातून नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून खुला करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे कि, गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजीनगर पुलाचे काम हे सुरु होते, त्यामुळे सामान्य लोकांना प्रवासासाठी ममुराबाद पुलाकडून किंवा पिंप्राळा रेल्वे गेट कडून वळसा घालून शिवाजी नगर किंवा तेथील परिसराकडे जावं लागायचे. या त्रासाला नागरिकांनी कित्येकदा प्रशासन दरबारी धाव घेतली तरीही त्यांना फक्त काम लवकर होईल हेच उत्तर मिळत असे, मात्र आज दीपक कुमार गुप्त यांनी जिल्हाधिकारी अभिजीय्त राऊत यांच्याशी दूरध्वनी च्या माध्यमातून पूर्वकल्पना देऊन पुलाचे उद्घाटन केले.

नागरिकांमध्ये यामुळे समाधान आणि आनंद असल्याचे दिसले. त्यांना होणारा त्रास आता कुठे जाऊन थांबला अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here