जळगाव ;-एमआयडीसी परिसरातील भारत गॅस कंपनी जवळ असणाऱ्या चटई कंपनीत काम करणाऱ्या तरुणाला पायी जात असतांना एका कारने धडक दिल्याने तो जखमी झाल्याची घटना १२ रोजी घडली होती . मात्र यात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, आकाश सतिश पाटील, वय 30 वर्षे, रा. चिखली ता यावल, जि. जळगांवहा तरुण एमआयडीसी भागातील चटई कंपनीत कामाकामाला असल्याने 12 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास त्याला भारत गॅस कंपनी समोरून रस्त्याने पायी जाताना फोर्स ट्रॅव्हलर या कंपनीचे चारचाकी वाहन क्र. एम एच 19 सी बाय 9882 याच्या वाहनचालकाने आकाश यास मागुन ठोस मारुन गंभीर जखमी केले. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता १४ रोजी उपचार सुरु असताना सकाळी ११ वाजता आकाश याचा मृत्यू झाला . यांबाबत नितीन रामचंद्र पाटील, वय 30 वर्षे, यांच्या फिर्यादीवरून १६ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशननला वाहनचालकाविरुद्ध वाहन हयगयीने भरधाव वेगाने चालवून व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आकाश ठोस मारून गंभीर जखमी करुन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला अशी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलं आहे . तपास पोलीस करीत आहे.



