Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»बस प्रवासात हृदयविकाराच्या झटक्याने सेवानिवृत्त नायब तहसीलदारांचा दुदैवी मृत्यू
    ताज्या बातम्या

    बस प्रवासात हृदयविकाराच्या झटक्याने सेवानिवृत्त नायब तहसीलदारांचा दुदैवी मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 15, 2023Updated:September 15, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल ;- यावल शहरातील महाजन गल्लीमध्ये राहणारे सेवानिवृत्त नायब तहसीलदार वसंत गणपत पाटील वय-८६ वर्ष हे नियमितपणे आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी जात असतांना बस प्रवासात हृदयविकाराच्या तीव्र झाटक्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शुक्रवारी घडली.

    सविस्तर वृत्त असे की यावलकडे येत असतांना एसटी बस मध्येच त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. यावल येथील राहिवासी वसंत पाटील हे जळगाव येथे डोळयांच्या तपासणीसाठी गेले होते. एसटी बस क्रमांक (एमएच २० बिएल ०९५३) बसमध्ये बसून परत येत असतांना दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांना ह्वदयविकाराच्या झटका आल्याने ते बेशुद्ध पडलेनंतर साकळी गावाजवळ बस आली असता ते मरण पावले असे एसटी कर्मचारी यांनी माहिती दिली.

    त्यांना बेशुद्ध अवस्थेत तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी आणले असता , वैद्यकीय अधिकारी डॉ मयुर चौधरी यांनी तपासणी केली असता त्यांना मयत घोषीत केले. चालत्या एसटी बसमध्ये प्रवासाचा मृत्यु होण्याची पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे. याबाबत एसटीतील यावल आगाराच्या वाहक रोशनी सोनवणे यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घटनेचे वृत्त कळताच यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन, वाहतुक चालक दिलीप ठाकरे यांनी ग्रामीण रूग्णालयात भेट दिली.

    #crime Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif