लग्न मंडपात सप्तपदी सुरू असताना ३० वर्षांच्या डॉक्टरचा हृदयविकाराने मृत्यू

0

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्याच्या धावपळीच्या युगात अनेक घटना घडामोडी प्रत्येकाच्या जवळपास घडत असतात. मात्र काही गोष्टींवर अनेकांचा विश्वास बसत नाही. लग्न मंडपात सप्तपदी सुरू असताना एका डॉक्टरचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या अल्मोडा जिल्ह्यातील एका गावात घडली .

डॉक्टराच्या छातीत अचानक दुखू लागले आणि चक्कर आल्याने तो खाली पडल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

समीर उपाध्याय असे या डॉक्टरचे नाव असून तो मॅट्रिक्स हॉस्पिटलमध्ये डेंटिस्ट होता. शुक्रवारी त्याच्या लग्नाची वरात निघाली. सप्तपदी घेण्यापूर्वी समीर उपाध्याय याची प्रकृती ठीक होती. मात्र, अचानक त्या़च्या छातीत दुखू लागले. डॉक्टर वराच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. डॉक्टरचं वय 30 वर्ष होते. डॉ. समीरच्या निधनाने कुटुंबात शोककळा पसरली आहे.

रंतु मुलाच्या मृत्यूमुळे सर्व काही अपूर्ण राहिले. डॉ. समीरला दोन बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. तर धाकटी बहीण डॉक्टर आहे. त्याचे वडील काही काळापूर्वी ओमानहून परतले आहेत. मात्र त्यांची प्रकृती बरी नाही. मुलाच्या मृत्यूने आई-वडिलांनी आधार गमावला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.