जळगाव : एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट नगरात काहींचा ट्रक चालकासोबत रात्री वाद झाला होता. त्यानंतर दि. ८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता ट्रकचालकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबबळ उडाली आहे.
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सागर रमेश पालवे (वय २५) रा. मालदभाडी ता. जामनेर असे मृत तरूणाचे नाव आहे.
ते पाच वर्षांपासून ते जळगाव येथील विदर्भ ट्रान्सपोर्ट कंपनीत ट्रकचालक म्हणून कामाला होता. काल गुरूवारी ७ सप्टेंबर रोजी त्याचे काही लोकांसोबत वाद झाला होता. तर शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्याचा ट्रान्सपोर्ट नगरात संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अच्छा यांनी मयत घोषीत केले. दरम्यान मयत सागर पालवे याच्या आंगावर जखमी असल्याने त्याला बेदम मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय
सागर पालवे हा आई व वडील यांच्यासोबत जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथे वास्तव्याला आहे. गेल्या चार महाविद्यालयातनातेवाईकांनी एकच आक्रोश केला. रात्री झालेल्या वादातूनच त्याचा घातपात झाल्याचा आरोप करीत संशयितांना अटक करीत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. मृत सागर पालवे यांच्या पश्चात आई नीलम, वडील रमेश व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.