Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»मि. परफेक्शनिस्टचा पत्ताच नाही. पण, भाचा आंदोलनात
    महाराष्ट्र

    मि. परफेक्शनिस्टचा पत्ताच नाही. पण, भाचा आंदोलनात

    विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला इमरान खानचा पाठिंबा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 23, 2026No Comments104 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    बॉलिवूडचे दिग्गज सेलिब्रिटी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या विद्यार्थ्यांसाठी मैदानात उतरले असताना, बॉलिवूडचे तिन्ही खान्स मात्र मौन बाळगून होते. अशातच बुधवारी रात्री उशिरा सलमान खाननं ट्वीट करुन विद्यार्थ्यांना आपला पाठींबा दिला. पण, इथे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या चिंतेनं अख्खा देश पेटलेला असतानाच मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीर खानचा पत्ताच नाही. पण, त्याचा भाचा अभिनेता इमरान खान मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.

    आमिर खानचा भाचा इमरान खान याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये इमरान खान विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होताना दिसतोय. त्याला मुंबईतील शिवाजी पार्क इथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना, त्यात अचानक इमरान खान दिसला.  नेटकऱ्यांकडून इमरान खानवर कौतुकाचा वर्षाव होतोय. तर, आमीर खाननं भाच्याकडून काहीतरी शिकावं, अशा कमेंट्सही नेटकऱ्यांकडून केल्या जात आहेत.

    व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेता इमरान खान काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेला आणि खांद्याला बॅग लावलेला दिसतोय. त्याला पाहताच विद्यार्थी त्याचे व्हिडीओ काढू लागले आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त करू लागले. इमरान आंदोलनातील विद्यार्थ्यांना सेल्फीसुद्धा देतोय.

    नीट पेपरफुटी प्रकरणी सोनम वांगचुक गेल्या 25 दिवसांपासून उपोषणावर आहेत. दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’चं आंदोलनही सुरू असून त्यांनी ‘संसद मोर्चा’चंही आयोजन केलं होतं. शबाना आझमी आणि प्रकाश राज यांसारख्या कलाकारांनी या आंदोलनात सहभाग घेतलाय. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही मोर्चे काढले जात आहेत. अभिनेता गुरफतेह सिंह पीरझादा आणि अभिनेत्री प्रतिभा रांटा यांनी मुंबईतील आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यावेळचे फोटोही शेअर केलेत.

    आयशा खानही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेली होती. तिनं दावा केलाय की, ती शांतपणे उभी असतानाच पोलिसांनी तिला बळजबरीनं व्हॅनमध्ये बसवलं आणि पोलीस ठाण्यात नेलं. तिनं या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, मात्र नंतर तिची सुटका करण्यात आली. उर्फी जावेदनंही सांगितलं की, ती आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेली होती, पण पोलीस तिथून सर्वांना बळजबरीनं हटवत असल्यामुळे तिला परत यावं लागलं. याशिवाय सोनाक्षी सिन्हा, हृतिक रोशन, नसीरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांसारख्या कलाकारांनीही या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif