Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»“गडकरी साहेब, तुम्हाला माझी जात माहितीये का?”
    महाराष्ट्र

    “गडकरी साहेब, तुम्हाला माझी जात माहितीये का?”

    बेधडक नानांचा थेट नितीन गडकरींना सवाल
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 19, 2026No Comments577 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    आपल्या रोखठोक मतांसाठी आणि बेधडक वक्तव्यांसाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे ओळखले जातात. नुकतंच नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी धर्म आणि जातीच्या राजकारणावरून डोळ्यांत अंजन घालणारं वक्तव्य केलं. या कार्यक्रमात मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा उपस्थित होते.

    “गडकरी साहेब, तुम्हाला माहितीये का माझी जात काय आहे”, असा थेट सवाल यांनी या कार्यक्रमात केला. मी कधीच कोणाला माझी जात सांगितली नाही आणि मला त्याची गरजही वाटत नाही, असं ते स्पष्ट म्हणाले. या कार्यक्रमात त्यांनी इतर विषयांवरही भाष्य केलं. नागपुरातल्या रेशीमबाग इथल्या सुरेश भट सभागृहात ‘जलक्रांती’ परिषद आयोजित करण्यात आलं होतं. या परिषदेला पाणी फाऊंडेशनचा संस्थापक आणि अभिनेता आमिर, नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे उपस्थित होते.

    कार्यक्रमात नाना म्हणाले, “मी माझी जात कधीच कुणाला सांगितली नाही. माझ्या आईने मला लहानपणीच एक गोष्ट शिकवली होती, जी मी आजपर्यंत पाळत आलोय. तुझी जात फक्त माणूस आहे आणि तुझा धर्म माणुसकी आहे, असं आई म्हणाली होती. त्यापलीकडे जाऊन स्वत:ची ओळख सांगण्याची गरज नाही. मुसलमान आणि हिंदू यांच्यातील फरक काय आहे, असा प्रश्न मी नेहमी आईला विचारायचो. त्यावर ती मला सांगायची की, हिंदू हात जोडून प्रार्थना करतात, तर मुस्लीम हात उघडून. आपल्या समाजातील जातव्यवस्था कधी संपणार नाही. जातीतील फरक ज्ञानाने आणि शिक्षणानेच संपवू शकतो.” नानांच्या या भाषणानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

    ओळख जातीवरून ठरते हे दुर्दैव

    यावेळी नाना पाटेकरांनी समाज आणि राजकारणात वाढणाऱ्या जातीयवादावर चिंता व्यक्त केली. “माणसाची ओळख त्याच्या स्वभावावरून किंवा कर्तृत्वावरून नाही तर तो कोणत्या जातीत जन्मला यावरून ठरवली जाते, हे दुर्दैवी आहे. आपण माणूस म्हणून एकत्र यायला हवं. तेव्हाच आपण जातीधर्माच्या भिंती पाडू शकू”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले. या कार्यक्रमात त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रशंसादेखील केली. गडकरी हे राजकारणातील अजातशत्रू आहेत, असं ते म्हणाले.

    #maharashtra nagpur Nana Patekar Nitin Gadkari
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif