श्री. संत झिंगुजी महाराज यांचा ८५ वा पुण्यतिथी महोत्सव

७, ८ व ९ डिसेंबरला विविध कार्यक्रम

0

 

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

स्थानिक श्री संत झिंगुजी महाराज देवस्थान समितीच्या वतीने श्री संत झिंगुजी महाराज यांचा ८५ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे दि.७, ८ व ९ डिसेंबरला विविध कार्यक्रमाद्वारे स्थानीय श्री.संत झिंगुजी महाराज देवस्थान येथे भव्य आयोजन करण्यात येणार आहे.

शनिवार दि. ७ डिसेंबरला सकाळी ५ वाजता घटस्थापना व श्री ची पूजा आरती, सकाळी ८ वाजता नगर स्वच्छता अभियान, सकाळी १० वाजता लीलावती दातांचा दवाखाना भद्रावतीच्या सौजन्याने दंत चिकित्सा शिबिर, दुपारी १२ वाजता रांगोळी स्पर्धा, सायंकाळी ५ वाजता भजन संध्या, सायं ७ वाजता प्रशांत शिंदे व परिवाराचे सौजन्याने स्वरांजली सुमधुर संगीतमय गीतांचा कार्यक्रम सादरकर्ते सनबिट ऑर्केस्ट्रा नागपूर, रात्री १०:३० वाजता जागृती भजन. रविवार दि. ८ डिसेंबरला सकाळी ६ वाजता श्री ची पूजापाठ व आरती, सकाळी ८ वाजता योग्या नेत्रालय व सर्जिकल सेंटरचे नेत्र शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत नागपुरे व डॉ. मोनिका नागपुरे यांच्या सौजन्याने भव्य नेत्र तपासणी शिबिर, सकाळी ८.३० वाजता चित्रकला स्पर्धा, दुपारी १२.३० वाजता भजन, दुपारी ४.३० वाजता वकृत्व स्पर्धा, सायं ६ वाजता सत्कार समारंभ प्रशस्तीपत्र व बक्षीस वितरण तसेच गौरवरत्नांचा सत्कार कार्यक्रम होईल.

याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री हंसराजभैय्या अहिर, खासदार प्रतिभाताई धानोरकर, नवनिर्वाचित आमदार करण देवतळे, तहसीलदार राजेश भांडारकर, ठाणेदार अमोल कातोरे, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा) रवींद्र शिंदे, जिल्हा भोई समाज सेवा संघ अध्यक्ष कृष्णाजी नागपुरे, अमित गुंडावार, मुनाज शेख, शिवसेना (शिंदे) जिल्हाप्रमुख बंडूभाऊ हजारे, रंजना पारशिवे, श्री गुरुदेव सेवा मंडळ प्रचारक विशाल गावंडे या मान्यवरांची उपस्थिती राहील.

सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. इंजि.पवनपाल दवंडे महाराज अमरावती यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम. सोमवार ९ डिसेंबरला सकाळी ६ वाजता श्री ची पूजा व आरती, सकाळी ११.३० वाजता ह.भ.प. अशोकजी चरडे महाराज यांचे गोपाल काल्याचे किर्तन व दहीहंडी, दुपारी १:३० वाजता श्रींच्या पालखीची प्रमुख मार्गाने भजन दिंडीसह भव्य मिरवणूक, सायंकाळी ६ वाजता पासून भव्य महाप्रसाद वितरीत करण्यात येणार. या तीन दिवसीय भव्य कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.