Wednesday, September 28, 2022

MPSC ची तयारी करणाऱ्यांसाठी खूशखबर ! रिक्त पदांच्या भरतीचा शासन निर्णय जारी

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीला अर्थ विभागाने मान्यता दिली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसंच एमपीएससीच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर देखील हा शासन निर्णय शेअर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 अंतर्गत 1 हजार 85 पदांची भरती होणार आहे. त्यात 100 सहाय्यक कक्ष अधिकारी, 609 राज्य कर निरीक्षक आणि 376 पोलीस उपनिरीक्षांची पदे भरली जाणार आहेत. राज्यातील 43 शासकीय विभागातील तब्बल अडीच लाखांहून अधिक पदं रिक्त आहे.

कोरोना महामारीच्या काळात निर्बंधांमुळे पदांची भरती झालेली नव्हती. तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील मेगभरतीही अजून झालेली नाही. आता महाविकास आघाडी सरकारने येत्या काळात राज्याच्या विविध विभागांमध्ये पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने एमपीएससीच्या कक्षेतील सर्वच पदे भरण्यासाठी मान्यता दिली आहे.

“11 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार शासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध मंजूर करुन घेतले आहेत. त्या सुधारित आकृतीबंधातील एमपीएससीच्या कक्षेतील पदे वगळता इतर 50 टक्के पदभरती करता येणार आहे,” असं जीआरमध्ये म्हटलं आहे.

ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या 11 फेब्रुवारी 2016 च्या शासन निर्णयनुसार सुधारित आकृतीबंध मंजूर केला, त्या सुधारित आकृतीबंधातील एमपीएससीच्या कक्षेतील पदे वगळता 50 टक्के पदे भरता येतील.

ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहे, अशा सुधारित आकृतीबंधातील एमपीएससीच्या MPSC कक्षेतील 100 टक्के पदांची भरती करण्यास परवानगी

कोविडच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांतर्गत 4 मे 2020 चे निर्णय लागू झाल्यानंतरच्या कालावधीत उच्चस्तरीय समितीने आणि उपसमितीने मान्यता दिलेली एमपीएससीच्या कक्षेतील 100 टक्के पदे भरण्यास मान्यता असेल.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या