पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क
पारोळा येथे धरणगाव चौफुलीवर नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच जळगावहून शहरात किंवा धुळ्याकडे जाताना अनेक वाहनांचे अपघात झाल्याने पारोळा येथील मा. खासदार ए. टी. पाटील यांनी या विषयांची गांभीर्याने दखल घेत सदर बाब नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांच्या निर्देशनास आणून दिली.
खासदार स्मिता वाघ यांनी ही सदर बाब गांभीर्याने घेत पारोळा येथे भेट देत नही च्या अधिकाऱ्यांना पारोळा येथील धरणगाव चौफुली येथे बोलवून घेतले. दोघं आजी व माजी खासदार यांनी शिवाजी पवार यांना विषयावर चांगलेच धारेवर धरले व काही सुचना दिल्यात.
या ठिकाणी तात्काळ स्पिड ब्रेकर, हायमस्ट लम्प, लावण्यास सांगितले. तसेच अंडर बायपास किंवा फ्लाय ओव्हर ब्रिज संदर्भात सुचना दिल्या.नँशनल हायवेचे अधिकारी यांनी सांगितले की, लवकरच अंडर बायपास किंवा फ्लायओव्हर करिता जो काही पाठपुरावा लागेल तो आम्ही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू.
याप्रसंगी मा. नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, सचिन गुजराथी, गणेश पाटील, अतुल पवार, नरेंद्र साळी, पिंटू चौधरी, अशोक चौधरी, अनिल टोळकर, शिवदास चौधरी, नरेंद्र पाटील, मनोज भटू चौधरी, गुलाब चौधरी, सुदाम चौधरी, दिलिप आबा, रेखाताई चौधरी ,अँड आफ्रे मँडम , यशोदा पाटील ,समाधान पाटील , देवा लांडगे, राकेश पाटील ,राहुल चौधरी, बाळू चौधरी यांच्यासह शहरातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.