पारोळा लोकशाही न्युज नेटवर्क
शिवसेनेच्या वतीने पारोळ्यात शिवसंवाद मेळाव्यासाठी आले असता खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना लक्ष करीत सांगितले की, सध्या राज्याची कायदा सुव्यवस्था डबघाईस आली असून सत्ताधारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पारोळा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले की, देशातील सरकार महाराष्ट्र राज्य लुटून गुजरातला नेत आहे. महाराष्ट्राला कंगाल करीत आहेत राज्याचे मुख्यमंत्री मात्र लाचार आहेत स्वाभिमान गहाण ठेवून पदे भोगत असुन येणाऱ्या काळात विरोधकांना त्यांची जागा दाखवून निष्ठावंत शिवसैनिकांची ताकद उभी करण्यासाठी मतदारांनी सज्ज राहून यापुढे महाविकास आघाडीला मतदान करावे असे आवाहन केले.
महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था डबघाईस आली असुन येणाऱ्या विधान सभेत गद्दारांना हद्दपार करावयाचे आहे . त्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहा अशी चौफेर फटकेबाजी खासदार संजय राऊत यांनी केली.
याप्रसंगी जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, संजय सावंत, माजी खासदार उन्मेष पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार, माजी सभापती बाळासाहेब पवार , एरंडोलचे दशरथ महाजन, नाना महाजन , रवींद्र चौधरी ,जगदीश पाटील , अमळनेरच्या डॉक्टर अस्मिता पाटील , ॲड. ललिता पाटील , महानंदा पाटील आदी उपस्थित होते.
खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, गद्दारांना गाडण्यासाठी आजची ही सभा असून निष्ठावंत शिवसैनिकांचा जोश बघून परंपरेनुसार एरंडोल पारोळाची जागा शिवसेनेला सुटेल असा आशावाद व्यक्त करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्या. ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले आहे . हा इतिहास असल्याचे सांगत पंधरा लाखाची भाषा करणारे आज पंधराशे रुपये रुपये देत असुन पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. अडीच वर्षे होऊनही हे सरकार कोणत्याच निवडणुका घेत नाही. त्यांना पराभवाची भीती असून खरी शिवसेना ठरवण्याचा अधिकार कोर्ट आणि निवडणूक आयोगाला नसून जनतेला आहे हे जनता येणाऱ्या निवडणुकीत ते दाखवून देणार आहे .
तर शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने आणि माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्या कार्यशैलीवर टीका करीत जाऊ तिथे खाऊ सध्या हाच धंदा सुरू केला असून उद्धव साहेबांच्या पाठित खंजीर खुपसणारे आपले आमदार असून मतदार संघाची जनता निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र आज या मेळाव्याच्या माध्यमातून दिसत आहे.
खरी शिवसेना फोडून ४० गद्दार केवळ स्वार्थासाठी पळून गेले. यांना येणाऱ्या निवडणुकीत यांचा हिशोब चुकता करावयाचा असून शिवसेनेला मानणारा हा मतदारसंघ असल्याचे सांगितले . मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा. आर. बी. पाटील यांनी केले.