रावेर लोकसभेसाठी भाजपची चाचपणी

0

लोकशाही संपादकीय लेख

लोकसभेच्या निवडणुकीसाठी अद्याप एक वर्षा पेक्षा जास्तचा कालावधी असला तरी प्रत्येक पक्षातर्फे योग्य उमेदवाराच्या संदर्भात चाचपणी आणि अभ्यास सुरू आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर लोकसभा संघाच्या विद्यमान भाजपच्या (BJP) खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांची दुसरी टर्म आहे. तिसऱ्यांदा त्यांना भाजपची उमेदवारी मिळायला काही हरकत नाही. कारण आपल्या खासदारकीच्या नऊ वर्षाच्या कालावधीत रक्षा खडसे यांनी आपला मतदारसंघ बांधून ठेवला आहे. लेवा पाटील उमेदवारचा मतदार संघ म्हणून रावेर लोकसभेकडे पाहिले जाते. कै. हरिभाऊ जावळे (Haribhau Jawle) यांच्यानंतर रावेर (Raver) लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसेंची प्रतिमा उजळ आहे. सतत जनसंपर्कात राहून मतदारसंघातील समस्या सोडविण्यात या अग्रभागी असतात. भाजपशी त्या एकनिष्ठ आहेत. असे असले तरी खासदार रक्षा खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या सून आहेत.

एकनाथ खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांच्यातील कौटुंबिक नात्यामुळे खासदार रक्षा खडसेंना ऐनवेळी राष्ट्रवादीत खेचून घेऊन रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी राष्ट्रवादीकडून रक्षा खडसेंना दिली जाईल, हे गृहीत धरून भाजपने ही चाचपणी सुरू केली असावी, असा अर्थ बांधण्यात येतो आहे. अखेर तर्कवितरकाला काही अर्थ नसतो. तथापि ऐनवेळी भाजप समोर प्रश्न निर्माण होऊन धोका पत्करण्या ऐवजी भाजपची रणनीती योग्यच आहे, असे म्हणता येईल. कारण रक्षा खडसेंना ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि नंतर खासदारकीची भाजपतर्फे उमेदवारी देऊन त्यांना राजकारणात आणण्याचा सिंहाचा वाटा एकनाथ खडसे यांचा आहे. त्यामुळे कौटुंबिक भावनिक नाते आडवे आले, तर ऐनवेळी भाजप समोर उमेदवारीचा पेच निर्माण होऊ नये, म्हणून सुद्धा ही चाचणी केली जात असावी. विद्यमान स्थितीत भाजप पक्षश्रेष्ठींची पहिली पसंती खासदार रक्षा खडसेंनाच राहील यात शंका नाही. खासदार रक्षा खडसे यांचे नेतृत्वात प्रगल्भ असे काम झाले आहे. कारण सासरे एकनाथ खडसे आणि सून खासदार रक्षा खडसे यांच्यात वैचारिक तफावत आढळून येते. एकनाथराव खडसे कमालीचे आक्रमक तर रक्षा खडसे मवाळ अशा आहेत.

फैजपूर व परिसरात जिल्ह्यातील जनार्दन हरी महाराज यांचे प्रस्त मोठे आहे. त्यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. आरएसएस यांच्या पाठीशी उभा आहे. फैजपूर येथे नुकतेच पार पडलेल्या समरसता महा कुंभात देशभरातून अनेकांनी हजेरी लावली. त्या पाठोपाठ जामनेर तालुक्यातील गोद्री येथे बंजारा समाजाचा महा कुंभ पार पडला. गोद्री कुंभाला सुद्धा आरएसएस बरोबरच्या आयोजनात जनार्दन हरी महाराज यांची हजेरी महत्वाची ठरली. त्यामुळे रावेर लोकसभेसाठी जनार्दन हरी महाराज हे भाजपचे उमेदवार ठरू शकतात, असे एकंदरीत चित्र दिसते आहे. याबाबत नुकताच पत्रकारांनी रक्षा खडसेंना प्रश्न विचारला की, “जनार्दन हरी महाराज यांना रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे उमेदवारी दिली, तर तुम्ही याकडे कसे पाहता?” यावर रक्षा खडसेंनी “भाजप तर्फे महाराजांना उमेदवारी दिली तर तरी त्यांच्या प्रचाराचे काम मी करेल,” असे मार्मिक उत्तर दिले. रक्षा खडसेंच्या उत्तरातून त्यांची प्रगल्भता दिसून येते. त्यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रमाणे आक्रमक न होता शांतपणे उत्तर देऊन श्रेष्ठींची मने जिंकली आहेत, असे म्हणावे लागेल. त्यामुळे स्वतःची खासदारकी गेली तरी, आपण पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचे कार्य करू, असं वक्तव्य करून खासदार रक्षा खडसेंनी बाजी मारली आहे.

जनार्दन हरी महाराज यांची रावेर लोकसभा मतदारसंघात लोकप्रियता असली तरी ती निवडणुकीच्या रिंगणात टिकणार नाही, असे त्यांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे. तरीसुद्धा भाजपकडून त्यांच्यावर उमेदवारी लादली तर रक्षा खडसे यांच्या प्रचार करण्याची तयारी आहेत. याचाच अर्थ रक्षा खडसेंकडून दुसऱ्या पक्षाची वाट धुंडाळली जाणार नाहीत, हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.

रावेर लोकसभा मतदारसंघातील खासदार कै. हरिभाऊ जावळे यांच्या अचानक निधनानंतर त्यांचे सुपुत्र अमोल जावळे यांना रावेर लोकसभेची उमेदवारी भाजप तर्फे मिळेल असा तर्क बांधला बांधण्यात येत आहे. भाजपच्या उमेदवारी चाचपणीचा तो एक भाग असला तरी अमोल जावळे हे भाजपचे रावेर लोकसभा मतदारसंघातील दावेदार असू शकतात. त्यांना रावेर लोकसभेची उमेदवारी भाजपकडून मिळू शकते. कारण केवळ वडिलांच्या पुण्याईवर लोकसभा निवडणूक जिंकणे, हे अमोल जावळे यांना अवघड जाईल. याची मात्र भाजप श्रेष्ठींना कल्पना आहे. अमोल जावळे यांच्यापेक्षा खासदार रक्षा खडसे यांची रावेर लोकसभेची उमेदवारी आजच्या घडीला तर सरस आहे, असेच म्हणावे लागेल. यामुळे रावेर लोकसभा मतदार संघासाठी भाजपतर्फे उमेदवारांची चाचपणी होत असेल आणि उमेदवार कोण राहील? याबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आलेले असले, तरी रक्षा खडसेच रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार असतील, यात दुमत असण्याचे कारण नाही…!

Leave A Reply

Your email address will not be published.