Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवकडे रवाना
    राजकारण

    खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवकडे रवाना

    बंडखोर खासदार तांत्रिकदृष्ट्या आजही शिवसेनेत
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 21, 2026No Comments267 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    ऑपरेशन टायगरने उद्धव सेनेला पुन्हा मोठे खिंडार पाडले. 6 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज दाखल केला आहे. तर फुटीर खासदारांनी व्हिप झुगारला. ते पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिले. बंडखोर खासदारांपैकी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण त्यांचे वडील, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे ओमराजे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान , शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला.

    माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना सोडली किंवा सोडतोय असं म्हटलं नाही. मी अद्याप शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला नाही, तर माझ्याविषयी या बातम्या का होतात असं ते म्हणाले. वडिलांच्या खटल्यात व्यस्त होतो, असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे वक्तव्य करता आलं नाही असं सांगितलं. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर त्यांच्याशी चर्चा करायला काही हरकत नाही. असे अजूनही खासदार आहे, त्यांच्याशी चर्चा करायला हरकत नाही.

    पुढे ते म्हणाले की, प्रत्येकाचा विषय पैसा आणि निधी येतो. निधी हे फुटण्याचं कारण नाही. मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस फुटले असते. मी विरोधी पक्षात आहे, हे माहीत असताना आणि संघर्ष आहे माहीत असताना उमेदवारी मागायला येता. लढण्याची भाषा करता. निवडून आल्यावर सत्तेची उब हवी असती. विरोधी पक्षात काम करणं ही सन्माची गोष्ट आहे. पण त्यांना २०० कोटींचा निधी, ५०० कोटींचा निधीची अमिष दाखवली जात आहे. २५ टक्के आणि ५० टक्क्याचं अमिष मिळतं. त्यात मोहात खासदार अडकत आहे.

    बंडखोर खासदारांविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, हे खासदार तांत्रिकदृष्ट्या आजही शिवसेनेत आहे. ओम बिर्ला यांच्याकडून कोणतेही अधिकृत निर्देश नाही. ज्या गटात जाणार आहे, असं सांगितलं जात आहे, त्या मिंधे गटाने चार पाच खासदार येणार हे विधान आलं नाही. शिवसेना सोडली असं या खासदारांनी जाहीर केलं नाही. ते व्हिपचं उल्लंघन करून बैठकीला हजर राहिले नाही. त्याबद्दल कारवाई सुरू आहे. हा तांत्रिक मुद्दा आहे. काही खासदार संपर्कात आहे. मतदारसंघात जायला त्यांना भीती वाटते. लोकांचा रोष आहे. खासदार म्हणतात आम्ही शिवसेनेत आहोत. काही गैरसमज होत आहे. अशा खासदारांशी चर्चा करणं स्वाभाविक आहे. ज्या क्षणी सांगतील शिवसेना सोडतील. तेव्हा संबंध तोडू. आज उद्धव ठाकरे ईशान्य मुंबईत येऊन मेळावे घेणार आहे. त्यानंतर २७ ते २९ तारखेला या सर्व खासदारांच्या मतदारसंघात जाणार आहे. नागपूर यवतमाळपासून दौरा सुरू होईल. तो शिर्डीला संपणार आहे. मराठवाड्यात जाणार आहे. ही एक प्रक्रिया आहे. त्यात धाराशिव, हिंगोली, परभणी आहे. या सर्व मतदारसंघात जाणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif