बाप्पांची मूर्ती उंचावरुन फेकली; राणा दाम्पत्याचा व्हिडिओ व्हायरल

0

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा नेहमी चांगल्याच चर्चेत असतात.  त्यांचा गणपती विसर्जनचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. राणा दाम्पत्याने विसर्जनावेळी गणपती बाप्पाची मूर्ती वरून पाण्यात फेकली.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी गणपती विसर्जनावेळी मूर्ती उंचावरून फेकल्याने हिंदू धर्माच्या प्रथांचा भयंकर अपमान झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संतापाची लाट येण्याची शक्यता आहे. हिंदुत्वावर नेहमी स्टंटबाजी करणाऱ्या या दाम्पत्याने विसर्जनाच्यावेळी गणपती बाप्पाची मुर्त्यू अक्षरशः पाण्यात फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

एखाद्या व्यक्तीला मदत देऊन त्याला हिंदू धर्माच्या प्रथेनुसार पाण्यात गणपती बाप्पाचे विसर्जन करून न घेता  राणा दाम्पत्याने  बाप्पाची मूर्ती थेट वरून खाली पाण्यात फेल्याच स्पष्ट होतंय.

दरम्यान काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही ट्विटवरुन हा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. ठेकेदारांच्या गणेश विसर्जनाची नवीन परंपरा… असे कॅप्शन देत लोंढे यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.