अभिनेत्री मौनी रॉय अडकली लग्नाच्या बेडीत!

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरज नांबियारशी लग्न बंधनात अडकली आहे. त्यांच्या हळदीचे आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर मौनीचे चाहते तिच्या लग्नाच्या फोटोंची प्रतिक्षा करत होते. आता मौनीचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

मौनी आणि सुरज यांचं लग्न मल्याळम परंपरेने झालं आहे. त्यांच्या लग्नातील पहिला फोटो मौनीचा जवळचा मित्र अर्जुन बिजलानीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अर्जुनने हे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मौनी आणि सुरज मंडपात उभे असल्याचे दिसत आहे. मौनी यात अतिशय सुंदर दिसत आहे.

मौनीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून तिला लाल रंगाची बॉर्डर आहे. मौनीने सोन्याचे दागिने घातले असून तिचा हा ब्राइडल लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तर दुसरीकडे सुरजने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

मौनी आणि सुरज हे गोव्यात लग्न करत आहेत. लग्नाआधी होणारे सगळे कार्यक्रम देखील तिथेच झाले आहेत. मौनी आणि सुरजच्या हळदी आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यांच्या या प्रीवेडिंग कार्यक्रमांमध्ये मंदिरा बेदी, अर्जुन बिजलानीसोबत आणखी बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here