Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»तिसऱ्या लग्नासाठी आईनेच केली चिमुकल्याची हत्या!
    गुन्हे वार्ता

    तिसऱ्या लग्नासाठी आईनेच केली चिमुकल्याची हत्या!

    बॅगमध्ये भरून; दगड बांधून विहिरीतही फेकलं
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 8, 2026Updated:April 8, 2026No Comments313 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    तिसर्‍या लग्नासाठी आईनेच आपल्या ११ वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी २२ वर्षाच्या महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. महिलेने ११ वर्षाच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर मृतदेह बॅगमध्ये ठेवला. दगड बांधून बॅग विहिरीत फेकल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिरूर तालुक्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. आरोपी महिलेचे नाव पूजा पवार असे आहे.

    २२ वर्षाच्या पूजा रविंद्र पवार हिला तिसरे लग्न करायचे होते. पण त्यामध्ये ११ वर्षाच्या मुलाचा अडथळा येत होता. त्यामुळे तिने काळजाच्या तुकड्यालाच संपवण्याचा निर्णय घेतला. पूजाने त्या बाळाची हत्या केली. पुरावे मिटवण्यासाठी पूजाने मृतदेह बॅगमधून भरला अन् दगड बांधून विहिरीत फेकला. दुसऱ्या लग्नापासून झालेला मुलगा तिसऱ्या लग्नासाठी अडथळा बनू नये, त्यामुळे तिनेच काळजाच्या तुकड्याची हत्या केली. रंजगांव एमआयडीसी पोलिसांनी पूजाला आज ११ महिन्याच्या यशची हत्या केल्याचा आरोपाखाली अटक केली आहे. पूजाने महिनाभरापूर्वी यशची हत्या केली होती. पूजा ही शिरूर तालुक्यातील भंभारडे गावातील राहणारी आहे.

    पोलीस अधिकारी महादेव वाघमारे आणि त्यांच्या पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. ५ एप्रिल रोजी पूजाचा पती रविंद्र अशोक पवार यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पूजा ८ मार्च रोजी ११ महिन्याच्या यशला घेऊन घरातून गेली, परतलेली नाही. दरम्यान, याआधीही पूजा मुलाला घेऊन घरातून निघून गेली होती. त्यामुळे रविंद्र पवार यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क केला नव्हता. पण खूप दिवस गेल्यामुळे रविंद्र यांनी अखेर पोलिसांत आई आणि बाळ बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

    रविंद्र यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी काही तासांतच शिरूरमधील जांबूत गावातून पूजाला शोधले. पोलिसांकडून पूजाची विचारपूस केली. पण पूजाने उडवाउडवीची उत्तरे दिली. ८ मार्च रोजी मूल प्लॅटफॉर्मवरून पडले अन् डोक्याला दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाले. धक्क्यामध्ये असल्यामुळे मृतदेह विहिरीत टाकल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पण पोलिसांनी तात्काळ विहिरीतून कुजलेला मृतदेह बाहेर काढला अन् पंचनामा केला. कुजलेला मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डोक्याला दुखापत झाल्यामुळे नव्हे तर जोरात आघातामुळे झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांकडून पूजाला खाकी दाखवली. त्यानंतर पूजाने गुन्हा कबूल केल्याची माहिती मिळाली.

    दगडावर आदळून बाळाची हत्या

    रविंद्र हे पूजाचे दुसरे पती होते. पण गेल्या काही दिवसांपासून नवरा-बायकोचा सतत वाद होत होते. त्यामुळे पूजाला तिसरे लग्न करायचे होते. पण यामध्ये मुलगा अडथळा ठरत होता. ८ मार्च रोजी ११ महिन्याचा यश सारखा रडत होता. त्यामुळे ती वैतागली होती. त्या रागाच्या भरात पूजाने त्या बाळाची दगडावर आदळून हत्या केली. हत्या लपवण्यासाठी पूजाने मृतदेह बॅगमध्ये भरला आणि दगड बांधून विहिरीत फेकला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    April 17, 2026

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.