Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    • देवझिरी-देवगडच्या जंगलात अवैध गांजाची १७५ झाडे जप्त
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»आई अन् मुलाने घेतला पैशाच्या वादातून बापाचा जीव!
    गुन्हे वार्ता

    आई अन् मुलाने घेतला पैशाच्या वादातून बापाचा जीव!

    आधी सायकल पंपाने डोक्यात वार नंतर आवळला गळा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 12, 2026No Comments544 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    गहाण ठेवलेली मोटारसायकल परत सोडवण्यासाठी पैशांची मागणी केल्यावरून झालेला कौटुंबिक वाद टोकाला गेल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोल येथे घडली. या वादातून ४५ वर्षीय करणसिंग रामसिंग पवार यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी अरुणाबाई पवार आणि १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे.

    पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी (११ ऑगस्ट) दुपारी सुमारास करणसिंग यांनी गहाण ठेवलेली मोटारसायकल सोडवण्यासाठी पत्नी अरुणाबाई यांच्याकडे पैशांची मागणी केली. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद वाढल्यानंतर आई आणि मुलाने मिळून करणसिंग यांच्यावर हल्ला केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

    या हल्ल्यात अल्पवयीन मुलाने सायकलमध्ये हवा भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पंपाने करणसिंग यांच्या डोक्यावर प्रहार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अरुणाबाई यांनी दोरीच्या सहाय्याने त्यांचा गळा आवळल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत करणसिंग यांचा मृत्यू झाला.

    दरम्यान, करणसिंग यांना दारूचे व्यसन असल्याने ते पत्नी आणि कुटुंबीयांना त्रास देत असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. याशिवाय कुटुंबाची परवानगी न घेता जमीन विकल्याच्या मुद्द्यावरूनही घरात काही काळापासून वाद सुरू असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

    कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी आणि कथित त्रासाच्या पार्श्वभूमीवर हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. पत्नी अरुणाबाई आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे.

    या घटनेमुळे आंबेहोल परिसरासह चाळीसगाव तालुक्यात आणि जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील नेमकी कारणे आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif