अभिमानास्पद; आई आणि मुलगा लोकसेवा आयोगाची परीक्षा एकत्र पास…

0

 

केरळ, लोकशाही न्यूज नेटवर्क;

केरळमधील मलप्पुरम येथील 42 वर्षीय महिला आणि तिचा 24 वर्षीय मुलगा यांनी मिळून लोकसेवा आयोगाची (PSC) परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

” माझ्या आईने मला येथे आणले आणि माझ्या वडिलांनी आमच्यासाठी सर्व सुविधांची व्यवस्था केली आम्ही एकत्र कोचिंग क्लासला गेलो होतो, आम्हाला आमच्या शिक्षकांकडून खूप प्रेरणा मिळाली. आम्ही दोघांनी एकत्र शिकलो पण आम्ही एकत्र पात्र होऊ असे कधीच वाटले नव्हते, आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत. असे विवेक म्हणाला.

जेव्हा मुलगा दहावीत होता तेव्हा बिंदूने त्याला प्रोत्साहन देण्यासाठी पुस्तके वाचण्यास सुरुवात केली परंतु यामुळे त्यांना केरळ पीएससी (PSC) परीक्षेची (EXAM) तयारी करण्यास देखील प्रेरणा मिळाली नऊ वर्षांत ती आणि तिचा मुलगा एकत्र सरकारी नोकरी करण्यास तयार आहेत.

बिंदूने लोअर डिव्हिजनल क्लर्क (LDC) परीक्षा 38 व्या रँकने उत्तीर्ण केली, तर तिचा मुलगा लास्ट ग्रेड सर्व्हंट्स (LGS) परीक्षा 92 रँकसह उत्तीर्ण झाला. तीन प्रयत्नांनंतर – दोन एलजीएस परीक्षेसाठी आणि एक एलडीसीसाठी बिंदूचा यांचा चौथा प्रयत्न यशस्वी झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.