Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पोंभूर्णा कृषी कार्यालयात कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता
    • दिवंगत अजित पवार यांची जयंती शासकीय स्तरावर होणार
    • विजय थलापतींचा ‘जन नायकन’ या तारखेला होणार रिलीज
    • महिला उपायुक्त 50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटकेत
    • जळगाव जिल्हा बॅडमिंटन २ री निवड चाचणी स्पर्धा
    • सामान्य माणूस असता तर त्याला अटक केली असती..
    • शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात
    • आता २१ जुलैनंतरच पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»१ मे पासून सर्व प्रकारच्या रासायनिक खतांची खरेदी बंद
    जळगाव जिल्हा

    १ मे पासून सर्व प्रकारच्या रासायनिक खतांची खरेदी बंद

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 30, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मोरगाव ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    गेल्या काही वर्षापासून रासायनिक खते बनविणाऱ्या व विक्री करणाऱ्या काही कंपन्या विनाकारण काही कॉम्प्लेक्स खतांवर किंवा युरीया, पोटॅश यासारख्या मागणी असलेल्या रासायनिक खतांवर त्यांच्या इतर उत्पादनाची सक्ती किंवा लिंकींग करून होलसेल विक्रेता यांना देतात. तेच होलसेल विक्रेते खाली किरकोळ विक्रेत्यांना याच प्रमाणे खते विक्री करतात. आणि किरकोळ विक्रेता मग या सर्व प्रकारामध्ये भरडला जातो.

    शेतकरी जेव्हा युरीया किंवा डि. ए. पी. खत घ्यायला किरकोळ दुकानात जातो तेव्हा तो किरकोळ दुकानदार त्याला त्या खतासोबत आलेले लिंकींग खत घेण्यासाठी आग्रह करतो. परंतु शेतकरी ते लिंकींग आलेले खत घ्यायला तयार नसतो व उगाचच त्या किरकोळ दुकानदाराची व शेतकऱ्यांची तू तू मै मै होत असते व एवढ्या वर्षांपासून त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध बिघडतात. एखाद्या किरकोळ दुकानदाराने जर विना लिंकींग खत द्यायचे म्हटले तर त्याला जे लिंकींग खत आलेले आहे. ते तसेच पडून राहते त्यामुळे आर्थिक नुकसान होत असते.

    अशी एक ना अनेक उदाहरण लिंकींग खताबद्दल व किरकोळ दुकानदाराबद्दल देता येतील. या सर्व गोष्टींपासून सुटका व्हावी व कायमस्वरूपी लिंकींगचा प्रश्न सुटावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा संघटनांनी माफदा संघटनेला पाठिंबा दर्शविलेला आहे. म्हणून दि. 1 मे 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या रासायनिक खतांची खरेदी बंदचा निर्णय माफदा संघटनेतर्फे घेण्यात आला आहे. तसेच जोपर्यंत लिंकींगचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही होलसेल व किरकोळ विक्रेता रासायनिक खतांची खरेदी करणार नाही, असे एका किरकोळ दुकानदाराने नांव न छापण्याच्या अटीवर आमच्या प्रतिनिधींना सांगितले.

    morgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पोंभूर्णा कृषी कार्यालयात कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता

    July 16, 2026

    जळगाव जिल्हा बॅडमिंटन २ री निवड चाचणी स्पर्धा

    July 16, 2026

    निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई

    July 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif