Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’!
    ताज्या बातम्या

    जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 14, 2026No Comments177 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

    जळगाव : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव यांच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘लखपती दीदी’ उपक्रमांतर्गत गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक महिलांची ‘लखपती दीदी’ म्हणून तयार झाल्या आहेत.
    या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील महिला तसेच स्वयं सहायता बचत गटातील सदस्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आवश्यक प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य प्रदान करणे आणि त्यांच्याकडून वार्षिक किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होईल याची हमी देणे हा आहे. योजनेअंतर्गत महिलांना विविध लघुउद्योग, गृहउद्योग तसेच उत्पादनाधारित व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.
    वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये जिल्ह्यास 1 लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्यक्षात 1,06,078 महिलांनी उद्दिष्टापेक्षा अधिक यश संपादन केले असून, त्यांना सुमारे रुपये 500 कोटी इतक्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. तसेच वित्तीय वर्ष 2025-26 मध्ये 1,11,000 महिलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, ते उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्यात आले आहे. या वर्षाकरिता देखील सुमारे रुपये 750 कोटी कर्ज रक्कम मंजूर असून, संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात अर्थ सहाय्य वर्ग करण्याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे.
    या योजनेअंतर्गत महिलांकडून पारंपरिक उत्पादनांबरोबरच विविध अभिनव व मूल्यवर्धित वस्तूंची निर्मिती करण्यात येत असून, त्यांच्या उत्पादनांना राज्यांतर्गत तसेच आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणास चालना मिळत आहे.
    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी कळविलेे की, स्वयं सहायता गटांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत त्यांना व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक सहाय्य करण्यात येत आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या संधी वाढीस लागून महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण साध्य होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif